सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

0
569
गोवा खबर:मगो सोडून भाजप मध्ये दाखल झालेल्या दीपक पाऊसकर यांनी रात्री साडे अकरा वाजता राजभवनवर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली.
जेमतेम 5 मिनिटे चाललेल्या सोहळ्यात पाऊसकर यांनी कोकणी भाषेमधून शपथ घेतली.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,पर्यटन मंत्री बाबू आजगावकर,विज मंत्री नीलेश काब्राल, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, भाजप महामंत्री सतीश धोंड यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.