गोवा खबर:गोवा राज्यात कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणांसह रस्त्यावर, रूग्णालये आणि कार्यस्थळांवर सगळ्या लोकांना चेहरा झाकणे अनिवार्य केले आहे.
सूचनांचे उल्लंघन करणार्या व्यक्तिकडून रूपये १०० दंड आकारला जाईल. पैसे न दिल्यास भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल.
“चेहरा झाकण्यासाठी” केमिस्ट कडे किंवा घरी बनवलेले धुण्या योग्य मास्क चा समावेश आहे जे योग्य धुण्या नंतर आणि निर्जंतुकीकरणानंतर वापरले जाऊ शकते.