सारस प्रदर्शनात यंदा देशभरातील ग्रामीण कारागीरांचे 200 स्टॉल्स

0
999

पणजीत 27 पासून सारस प्रदर्शनाचे आयोजन
पणजी:केंद्रीय ग्रमीण विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी आयोजित केले जाणारे सारस प्रदर्शन यंदा 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून देशभरातील ग्रामीण कारागीरांसाठी 200 स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यातील 50 स्टॉल्स गोव्यातील स्वयंसहाय्य गटांसाठी असतील अशी माहिती राज्याचे ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर,उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि पणजीचे महापौर यांच्या उपस्थित उद्धाटन सोहळा पार पडणार आहे.
विविध सरकारी खात्यासाठी 20 स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत.28 नोव्हेंबर पासून दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार केले जाणार असून सारस मध्ये छोट्या मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.त्याशिवाय जे गट सारस मध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.दिवाळीची सुट्टी असल्याने देशी पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी सारस मधून 1 कोटी 25 लाखांची उलाढाल झाली होती.यंदा आयोजनासाठी 70 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.