सायबर एजचे लॅपटॉप निवडणूक संपल्यानंतर मिळणार:पर्रिकर

0
898
पणजी मतदारसंघातून भाजपतर्फे पोटनिवडणुक लढवत असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी आज युवकांशी संवाद साधला. सायबर एज योजनेसाठी बजेट मध्ये 79 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत दिले जाणारे लॅपटॉप निवडणूक आचारसंहिता संपल्या नंतर वितरित केले जाणार आहे.सर्वप्रथम जे पात्र विद्यार्थी 12 उत्तीर्ण होऊन गेले त्यांना लॅपटॉप वितरित केले जातील अशी माहिती पर्रिकर यांनी एका युवतीच्या प्रश्नावर बोलताना दिली. पर्रिकर म्हणाले खर तर आचारसंहिता लागू होण्या पूर्वी लॅपटॉप देण्याचा आमचा प्रयत्न होता मात्र तेवढ्यात जीएसटी लागू झाला.जीएसटी मुळे लॅपटॉपचे दर एक ते दोन टक्क्यानी स्वस्त होणार होते त्यामुळे दरचा आढावा घेण्यासाठी काही काळ गेला.या योजनेसाठी निविदा काढून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.आचारसंहिता संपल्या नंतर त्यांचे वितरण केले जाईल असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. जीएसटी मुळे लॅपटॉप 1 टक्केने स्वस्त झाले असल्याची माहिती पर्रिकर यांनी यावेळी दिली.
एका प्रश्नावर बोलताना पर्रिकर यांनी ड्रग्सची पाळेमुळे खणून काढ़ण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. जे पोलिस अधिकारी कर्तव्यात कमी पडतील त्याची गय केली जाणार नाही.विशेष म्हणजे या कारवाई वेळी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न घेता काम करा असे सक्त आदेश आपण पोलिस यंत्रणेला दिले असल्याने अलीकडे ड्रग्स विरोधात जोरदार कारवाई सुरु असल्याचे दिसून येत असल्याचे पर्रिकर म्हणाले.
रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना पर्रिकर म्हणाले रोजगार गोव्यात भरपूर आहे.त्यामुळे गोव्या बाहेरुन आलेल्या लोकांना देखील काम मिळते. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाल्याने काही कामे आपण करण्याचे टाळतो.श्रमाची प्रतिष्ठा वाढायला हवी तर आपण सवयी लावून घेतल्या पाहिजे असे सांगून पर्रिकर म्हणाले,मी पहाटे 5 वाजता उठतो,घरात कुठे कचरा असेल तर मी झाडू घेऊन साफ करतो.माझ्या फाइल्स मीच हलवतो.यात आपल्याला कमीपणा वाटत नाही.
पर्रिकर यांनी शिक्षण,संरक्षण,सामाजिक,
राजकीय विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दैनिका सामना मधून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा समाचार घेताना तो अग्रलेख ज्या खोट्या बातमीवर होता त्यावर भाष्य करताना काँग्रेस अशा प्रकारच्या डर्टी पॉलिटिक्स मध्ये माहिर असल्याची टिका केली.यावेळी प्रदेशाध्यक्ष  विनय तेंडूलकर,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.
https://www.facebook.com/BJP4Goa/videos/1573880599338773/