सायकलवरून पावांची विक्री करणा-यांसाठी नावनोंदणी आवश्यक

0
493

 

गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने गोमंतकीय जनतेचा ब्रेड (पाव) हा मुख्य आहार असल्याने सायकलवरून पावांची विक्री करणा-यांनी सुरक्षित आणि पौष्ठीक पाव उपलब्ध करून देण्यात येत असल्याची खात्री करून देण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सायकलवरून पावांची विक्री करणा-या सर्व व्यक्तीनी अन्न सुरक्षा आणि कायदा २००६ खाली आपल्या प्रत्येक सायकलवर माहिती फलक लावावा त्यात बेकरीचे नाव, एफएसएसएआय नोंदणी क्रमांक व संपर्क क्रमांकांची नोंद असावी.

      पुढे पारंपारिक बेकरीनी नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना घेतल्यानंतरच बेकरी सुरू कराव्या व स्वच्छताविषयक आणि आरोग्यदायी नियमांचे पालन करावे. ग्राहकांनीही यासंबंधी दक्ष रहावे आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्यास तक्रार नोंदवावी.

      संचालनालयामार्फत कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यवसाय ऑपरेटरनी वरील अटींचा पालन करावे.