साबांखा मंत्री ढवळीकर विधानसभेत दाखल

0
1703
 गोवा खबर:सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आज सायंकाळी अनपेक्षितपणे विधानसभेत हजेरी लावून सगळ्याना चकित केले.
ढवळीकर हे आपल्या वरील उपचारासाठी मुंबई येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये 9 जुलै रोजी दाखल झाले होते.त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्या नंतर काही दिवस मुंबईत नातेवाईकांकडे विश्रांती घेऊन ढवळीकर गोव्यात दाखल झाले होते.19 जुलै पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाला ते हजर राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.पहिले 2 दिवस ढवळीकर उपस्थित नव्हते.आज देखील ते येतील की नाही हे स्पष्ट नव्हते.
सायंकाळी साडेपाच वाजता कमरेला पट्टा बांधून ढवळीकर विधानसभेत हजर झाले तेव्हा सगळ्यानाच धक्का बसला.
पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला प्रतिसाद न देत ते सभागृहाच्या दिशेने निघुन गेले.
ढवळीकर यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरनी दिला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.पुढचे काही दिवस ढवळीकर सार्वजनिक कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार नसल्याचे समजते. आज विधानसभेत हजर झालेले ढवळीकर आपल्या खात्याच्या प्रश्नांवर स्वतः उत्तर देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रीमंडळाला आजारपणाचे ग्रहण लागले आहे.मुख्यमंत्री स्वतः आजारी असून 3 महीने अमेरिकेत उपचार घेऊन गेल्या महिन्यातच ते गोव्यात दाखल झाले आहेत.अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री पुढील उपचार करून घेण्यासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार आहेत.
वीजमंत्री पांडूरंग मडकईकर हे देखील मुंबईतील हॉस्पिटल मध्ये दाखल असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.आजारी असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहु शकले नाहीत.
नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा यांची प्रकृती ठीक नसल्याने ते पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावू शकले नव्हते.आज त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईमधील कोकीलाबेन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.डिसोझा पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसात हजेरी लावू शकले नव्हते.प्रदीर्घ आजारपणा नंतर आज ते विधानसभेच्या पायऱ्या चढले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसात हजेरी लावू शकले नव्हते.प्रदीर्घ आजारपणा नंतर आज ते विधानसभेच्या पायऱ्या चढले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसात हजेरी लावू शकले नव्हते.प्रदीर्घ आजारपणा नंतर आज ते विधानसभेच्या पायऱ्या चढले.