साखळी येथे सहकार सप्ताह संपन्न

0
480

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  यानी रविंद्र भवन साखळी येथे आयोजित केलेल्या  कार्यक्रमात ६७ वा सहकार सप्ताहाचे सहकार मंत्री  गोविंद गावडे आणि सभापती  राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत उदघाटन केले.

हा कार्यक्रम सहकार खाते, डिचोली सहकार संस्थेचे साहाय्यक निबंधक विभाग यांनी संयुक्तपणे सत्तरी अर्बन सहकारी संस्था आणि गोमांचल दुग्ध शेतकरी सहकारी संस्था, कुडणे यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. कोविड महामारी आत्मनिर्भर भारत अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात अधिकाधिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व सदस्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. इच्छित उद्दिष्ट साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अथक प्रयत्न करण्याचे सांगितले. राज्यात अनेक सहकार संस्था असून या क्षेत्रात अधिकाधिक कार्यक्रम हाती घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्व संबंधितांनी या क्षेत्रात अधिकाधिक सदस्यांचा समावेश करण्यास प्रयत्न करण्याचे सांगितले.  

 

स्वयंमदत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यासाठी नाबार्डतर्फे साखळी नगरपालिकेच्या सहकार्याने दुकान उघडण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

दुग्ध शेतकर्‍यांना आत्मनिर्भर भारताखाली रू. १,६०,००० बिनाव्याज कर्ज उपलब्ध केल्याबद्दल गोवा राज्य सहकार बँकेचे अभिनंदन केले. सहकार क्षेत्रामुळे स्वयंपूर्ण गोवाचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्समंत्री, सहकारमंत्री आणि सभापतींच्या हस्ते डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील  व्यक्तींचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.