साई सेवा ट्रस्टला साईभक्तांची मुक्तहस्ते देणगी

0
1012

गोवा:शिर्डी येथील साई बाबा यांच्या समाधी शताब्दी सोहळ्यातील साई पादुका दर्शन सोहळ्यासाठी स्थापन केलेल्या साई सेवा ट्रस्टला साई भक्तांनी मुक्तहस्ते देणग्या देण्यास सुरुवात केली आहे.आज प्रसिद्ध उद्योजक मनोज काकूलो यांच्या हस्ते देणगी कूपन आणि पावती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.काकुलो यांनी 5 लाख रूपयांची देणगी देऊन या सोहळ्यात आपले योगदान दिले आहे.यावेळी उद्योजक अनिल खंवटे, गौरीश धोंड, शिवा बाबा नाईक,सतीश नाईक आदी उपस्थित होते.
आशुतोष खांडेपारकर यांनी आज 2 लाख रूपयांची देणगी दिली. त्यांना काकुलो यांच्या हस्ते पावती देण्यात आली.अनिल खंवटे यांनी 5 लाख 10 हजार,फोंडा येथील अनिल नाईक यांनी 2 लाख,वास्को येथील रवी नायडू यांनी 5 लाख रूपयांच्या देणग्या दिल्या असल्याचे खंवटे यांनी सांगितले. सिंधी समाजाच्या वतीने रवी बच्चानी आणि मारवाड़ी समाजाच्या वतीने ओमप्रकाश द्विवेदी यांनी महाप्रसादासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.