सांताक्लोज बनून कळंगुट पोलिसांनी दिले वाहतूक नियम पाळण्याचे धडे

0
956

  • गोवा:ख्रिसमसच्या रात्री सांताक्लॉज येऊन खुप साऱ्या भेटवस्तू देत असल्याने लहान मुले सांताक्लॉजची चातका सारखी वाट बघत असतात.ख्रिसमस मध्ये सांताक्लोजला विशेष महत्व असते.कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी हाच धागा पकडून अनोख्या पद्धतीने सांताक्लॉज साकार केला.
    राज्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून साथ दिली तर अपघात कमी होतील असा विश्वास असलेल्या दळवी यांनी आज आपल्या कर्मचाऱ्यांसह सांताक्लॉज सोबत कळंगुट परिसरात येणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश देत मिठाईचे वाटप केले. दळवी यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला सांताक्लोज बनवले होते.वाहन चालकांचे प्रबोधन करण्यासाठी खास पत्रके छापुन घेतली होती.2 तास चाललेल्या या विशेष मोहिमे 500 हुन अधिक वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले.
    दळवी यांनी पुढाकार घेऊन यंदा प्रथमच कळंगुट पोलिस स्थानकाच्या आवारात भव्य गोठा उभारला आहे.हा गोठा साकारण्यात पोलिस कॉन्स्टेबल लॉरेन्स परेरा यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.गणेश चथुर्थी वेळी देखील दळवी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले होते.