सहा चेंडूत सहा बळी; ल्यूक रॉबिन्सन नवा विश्वविक्रम

0
981

लंडनमधील एका १३ वर्षीय पोरानं आपल्या एका ओव्हरमध्ये  सहा चेंडूत सहा बळी घेतलेच, पण या सहाही फलंदाजांना त्रिफळाचित करून त्यानं सगळ्यांनाच चकित केलं. ल्यूक रॉबिन्सन असं या उगवत्या ताऱ्याचं नाव आहे.

१३ वर्षांखालील खेळाडूंच्या स्पर्धेत फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबकडून खेळताना ल्यूकनं ही किमया केली. विशेष म्हणजे, तो हा विश्वविक्रम रचत असताना त्याचे वडील आणि भाऊ त्याच्यासोबत मैदानावरच होते, तर आई स्कोअरर होती. आजोबांनीही सीमारेषेवर उभं राहून नातवाचा हा कारनामा ‘याचि देहि याचि डोळा’ पाहिला. ल्यूकचे वडील स्टीफन रॉबिन्सन पंच आहेत, तर भाऊ मॅथ्यू त्याच्याच संघातून खेळतो. या सगळ्यांनीच ल्यूकच्या भन्नाट कामगिरीचं भरभरून कौतुक केलं.

गेली ३० वर्षं मी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळतोय. मी स्वतःही हॅटट्रिक घेतली आहे. पण अशी गोलंदाजी कधीच पाहिली नव्हती, असं सांगत स्टीफन यांनी आपल्या मुलाची पाठ थोपटली.