सलारपुरीया सत्त्वने वॉटर्स एज या आपल्या पहिल्या बुटिक अपार्टमेंट्ससह केले गोव्यात पदार्पण

0
1214

 

~टू आणि थ्री बीएचके अपार्टमेंट्सच्या माध्यमातून आणली आहेत अत्युत्कृष्ट लक्झरी होम्स ~

 

 गोवा खबर: सलारपुरीया सत्त्व समूह या देशातील सर्वांत विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रॅण्ड्समध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रॅण्डने वॉटर्स एज या आपल्या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश केला आहे. सॅनकोअल गोवा येथील या अपार्टमेंट्स अत्यंत मोक्याच्या जागी- दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळापासून गाडीने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत.

 

पाच एकर भूखंडावर बांधलेल्या सलारपुरीया सत्त्वच्या ‘वॉटर्स एज’मध्ये चार इमारती आहेत. प्रत्येक इमारत स्टिल्ट + ५ मजल्यांची असून, यामध्ये काही टू बीएचके तर काही थ्री बीएचके अपार्टमेंट्स आहेत.  लीझर अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ १६७५ चौरसफूट ते २३८५ चौरसफूट (सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ) या दरम्यान असून एका अत्युत्कृष्ट जीवन अनुभवाची खात्री ही घरे देतात.

 

या लाँचिंगबद्दल सलारपुरीया सत्त्व समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिजय अगरवाल म्हणाले, “गोवेकरांना एक अत्युत्कृष्ट आरामदायी जीवनशैली प्रदान करण्याच्या हेतूने आमचा हा नवीन प्रकल्प डिझाइन करण्यात आला आहे. सुंदर घरांसोबतच सर्वोत्तम दर्जाच्या सोयी आणि सुविधा (अॅमेनिटीज) देण्याचा आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे वचन आम्ही येथेही पूर्ण केले आहे. गोव्याच्या बाजारपेठेत वॉटर्स एज घेऊन प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला अन्य शहरांमधील ग्राहकांकडून जसा प्रतिसाद मिळाला तसाच येथेही मिळेल अशी आशा वाटते.”

 

सलारपुरीया सत्त्वच्या वॉटर एजच्या रहिवाशांना ताजेतवाने होण्यासाठी इनडोअर गेम्ससह एक जागतिक दर्जाचे क्लब हाउस उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय एक अॅम्फिथिएटर, रिसॉर्ट्‌समध्ये असतो तसा स्विमिंग पूल, टेबल टेनिस कोर्ट, जिम्नॅशिअम, लहान मुलांसाठी खेळणी आणि लॅण्डस्केपिंग केलेल्या मोकळ्या जागा येथे आहेत.

 

वॉटर्स एजमध्ये पॉवर बॅकअप आणि संरक्षित प्रवेशद्वार अशा सर्वोच्च दर्जाच्या तंत्रज्ञानात्मक सुविधाही आहेत. रहिवाशांच्या सोयींचा विचार करून हे ठिकाण निश्चित करण्यात आले. ही जागा बोगमालो बीचपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर, तर कलंगुट आणि बागा बीचला जाण्यासाठी येथून गाडीने ४५ मिनिटे लागतात. दूरवर दिसणारे मसाल्याचे मळे तसेच नारळाच्या बागा, मधून मोहक वळणे घेणारी नदी आणि बंदरात पोहोचणारी जहाजे यामुळे परिसर नेत्रसुखद आहे. सर्व वयोगटांना आरामशीर आणि सोयीस्कर होईल अशा दृष्टीने सलारपुरीया सत्त्वच्या वॉटर्स एज प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

टेकडीच्या माथ्यावर असलेल्या या इमारतींतून शांत झुआरी नदी जवळच्या अरबी समुद्राला मिळतानाचे दृश्य दिसते. सलारपुरीया सत्त्वचे वॉटर्स एज हे दक्षिण गोव्यातील एक उत्तम विसाव्याचे ठिकाण आहे.

 

सलारपुरीया सत्त्वबद्दल

 

गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असलेला सलारपुरीया सत्त्व समूह आज देशातील सर्वांत विश्वासार्ह बिल्डर्सपैकी एक आहे. भारतातील बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या समूहाचे हैदराबाद, कोलकाता, पुणे, कोइमतूर, जयपूर आणि गोव्यात हा समूह प्रसिद्ध आहे. हा समूह लवकरच आपले कार्यक्षेत्र मुंबई आणि अहमदाबादमध्ये विस्तारणार आहे. २६ दशलक्ष चौरसफूटांचे बांधकाम पूर्ण, ३८ दशलक्ष चौरसफूट सध्या बांधकामाखाली आणि आणखी ३० दशलक्ष चौरस फुटांसाठी नियोजन असा पसारा असलेला हा समूह आज भारतातील प्रमुख बिल्डर्समध्ये गणला जातो. सलारपुरीया सत्त्वचा प्रमुख व्यावसायिक प्रकल्प आणि आशियातील सर्वोत्तम आयटी टेक पार्क- नॉलेज सिटी हा देशातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पसंतीचे स्थान म्हणून वेगाने विकसित होत आहे. समूहाचे हैदराबादमधील आणखी अतिप्रगत प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत: नॉलेज कॅपिटल, नॉलेज पार्क आणि इमेज टॉवर्स (तेलंगणा राज्य सरकारसोबत चालवलेले पीपीपी आधारित प्रारूप). यामुळे तेलंगणमध्ये समूहाचे एकूण काम २० दशलक्ष चौरसफुटांचे होणार आहे. समूहाने अविचलपणे टिकवून ठेवलेल्या दर्जामुळे तो आत देशातील सर्वाधिक “विश्वासू” बिल्डर्समध्ये गणला जात आहे. क्रिसिलने दिलेल्या “ए स्टेबल” मानांकनासाठीही समूह ओळखला जातो.

 

For more information:

Sonakshi Mary Murze
sonakshi.mary@sattvagroup.in

7022027847

 

Aditi Krishnan
Aditi.krishnan@mslgroup.com
9986906067