गोवा खबर:बॉलीवुडचा दबंग खान नेहमी फॅन सोबत ह्यूमन बीइंग सारखा वागत असल्याचे आढळून आले आहे.सल्लूचा बॉडीगार्ड शेरू हा सल्लूच्या फॅन्सना अटकाव करण्यात,मारहाण करण्यात नेहमी चर्चेत असतो.आज मात्र सल्लू शेरूच्या भूमिकेत दिसल्याने सगळ्याच्या भुवया ऊंचावल्या आहेत.
सलमान खान आज काही कामा निमित गोव्यात आला आहे. सकाळी साडे सात वाजता तो दाबोळी विमानतळावरील मुख्य प्रवेश द्वारावरुन बाहेर येत असताना त्याने केलेल्या एका कृत्याने त्याचे गोव्यातील फॅन दुखावले असून सोशल मीडिया वरुन सल्लूवर टिकेची जोरदार झोड उठवत आहेत.
गोवा खबर:बॉलीवुडचा दबंग अर्थात सलमान खान आज फॅन्सच्या टीकेचा धनी बनला. दाबोळी विमानतळावरुन बाहेर पडताना त्याने सेल्फी घेणाऱ्या एका फॅनला रागाने दिलेल्या झटक्यामुळे सिनेमात हीरो असणारा सल्लू गोव्यात मात्र व्हिलन बनल्याचे पहायला मिळाले. pic.twitter.com/1TKqjJGzyn
— Dev walavalkar (@walavalkar) January 28, 2020
नेहमी प्रमाणे सलमान मुख्यप्रवेश द्वारातून बाहेर येत असताना त्याच्या पुढे असलेला एक फॅन मोबाइल कॅमेऱ्या वरुन सेल्फी घेत होता.त्याच्या मागून येणाऱ्या सलमानला ही गोष्ट आवडली नसावी.त्याने रागाने हात मारून त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या बॉडी गार्डच्या गराडयातून सलमान तड़क निघुन जाताना दिसतो.बाहेर उभे असलेले फॅन देखील सलमानला हाक मारण्याचा प्रयत्न करतात पण सलमान तडक निघुन जातो.
सलमानचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून सोशल मीडियावरुन त्यावर टिकेची झोड उठवली जात आहे.
सलमानने ज्याला झटका दिला तो एका विमान कंपनीचा कर्मचारी असल्याची चर्चा असून अद्याप याप्रकरणी कोणतीच तक्रार दाखल झाली नसल्याचे विमानतळ सुत्रांनी सांगितले.
आज दिवसभर गोव्यात सल्लू को इतना गुस्सा क्यो आया,याचीच चर्चा रंगली आहे.