सर्वांनी धैर्याने आपल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे”: राज्यपाल

0
890

गोवा खबर:“विद्वान-योध्दा बनण्यासाठी वाचनाबरोबरच तुमच्यात अद्ययावत बदल घडवा’’, असे राज्यपाल  मृदुला सिन्हा यांनी  वेरे येथील नेवल वॉर कॉलेजमध्ये आयोजित ३१ व्या नेवल हायर कमांड कोर्सच्या समारोप कार्यक्रमावेळी म्हटले.

यावेळी बोलताना त्यांनी, आयुष्यात पुढे जात असताना राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी धोरण, समुद्री ऑपरेशन तसेच तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि व्यूहशास्त्रात संयुक्त ऑपरेशन आणि विकास या विषयात वाचन आणि संशोधन करा, असे सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही धैर्याने आणि उच्चस्तरीय वैयक्तिक अखंडतेने आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. या पारदर्शकतेत व्यक्तिगतरित्या जर एखाद्याने अविवकबुध्दीने जर एखादी गोष्ट केली तर ती सेवेसाठी प्रतिकूल प्रसिध्दी उत्पन्न करू शकते. राज्यपालांनी सहभागी झालेल्या सर्वांना त्यांच्या कामात आणि नेतृत्व, जबाबदारी आणि उत्तरदायित्व सांभाळताना प्रामाणिक राहण्याची विनंती केली. कारण नेहमीच आपल्या सर्व कृती छाननीच्या अधीन असतील. आपल्या सेवेत प्रामाणिक राहणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे हेच रहस्य असते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्रे प्रदान केली आणि या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या अधिकार्‍यांना पुरस्कारही प्रदान केले. यावेळी राज्यपालांनी चीन वरील संशोधन पेपरांचा संग्रह “चायना कंपॅनडीयम” चे चौथ्या आवृत्तीचे अनावरण केले.

प्रारंभी, नेवल वॉर कॉलेजचे कमांडंट संदीप बिचा यांनी स्वागतपर भाषण केले.

एनएचसीसी हा एनडब्ल्यूसीचा फ्लॅगशिप अभ्यासक्रम आहे, जो ३७ आठवड्यांचा असतो ज्यात देशात सामान्य आणि सशस्त्र सेनेत धोरणात्मक आणि परिचालनाचे महत्व हा विषय हाताळला जातो. भारतीय नौसेनेचे आणि सशस्त्र सेनेतील समतुल्य श्रेणीतील कॅप्टन यात सहभाग घेतात.