गोवा खबर:राज्यातील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्या बरोबरच विकास कामे मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्घ आहे. मोपा विमानतळ 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु होणार असून त्यानंतर गोव्यातील सुमारे 20 हजार गोमंतकीय बेरोजगारांना सरळ रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.
Addressed several corner meetings along the Zilla Panchayat election campaign trail in Mayem today. Pleased by the excellent response all along. @BJP4Goa pic.twitter.com/cHqBRcfyHn
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 11, 2020
मये मतदारसंघाचे जिल्हा पंचायत उमेदवार शंकर चोडणकर यांच्या प्रचारासाठी मये पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रविण झांट्ये, उमेदवार शंकर चोडणकर, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेच्या सरपंचा उर्वी मसूरकर, उपसरपंच विश्वास चोडणकर, पंचसदस्य सीमा आरोंदेकर, विनीता गावकर, तुळशीदास चोडणकर, संतोष गडेकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरती बांदोडकर उपस्थित होत्या.



या राज्यातील जिल्हा पंचायतींना ज्यादा अधिकार व निधी देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे. यावषी पंधराव्या वित्त आयोगाकडे सरकारने केलेल्या शिफरशीनुसार उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींना दरवषी 15 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यकाळात एखाद्या जिल्हा पंचायत सदस्याने केलेली विकासकामे येणाऱ्या काळात दुप्पटीने करायला संधी मिळणार आहे. सध्या राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असल्याने या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
राज्यात तसेच केंद्रातही भाजपचे सरकार असून राज्याचे युवा मुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी वावरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याचा सर्वांगीण विकास होणार हे निश्चित आहे. मयेतील मये तलाव विकसित होत असताना या गावात तसेच परिसरातील भागांचा ग्रामीण पातळीवर पर्यटन विकास साधण्यासाठी सरकारी पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. चोडण पुल दोन वर्षात पूर्ण होणार असून मयेत रेल्वे स्थानक येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच गोव्यातील खाणी सुरू होणार असून राज्यासमोरील अनेक विषय चालीस लागणार आहेत असे सांगून मयेचे आमदार प्रविण झांट्ये यांनी भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
मागील निवडणुकीत पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत निवडून येऊन लोकांच्याही विश्वासाला पात्र ठरण्याचा आपण प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत या मतदारसंघाचा मोठया प्रमाणात विकास झालेला असून अशा प्रकारचा विकास यापूर्वी कधीही झालेला नाही. त्याची पावती म्हणून पक्षाने पुन्हा आपल्याला उमेदवारी दिली आहे. कार्यकर्ते व मतदारांच्या बळावर आपण हि उमेदवारी स्विकारली असून मयेत आपला विजय मतदारांनी निश्चित केला आहे. विकास हि प्रक्रिया सरकारच्या बळावर होत असते त्यासाठी सरकारच्या समर्थनाला पाठिंबा देणे गरजेचे आहे,असे आवाहन उ शंकर चोडणकर यांनी केले.
स्वागत पंचसदस्य तुळशीदास चोडणकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वास चोडणकर यांनी मानले.
