सरदेसाईंचा प्लान बी फक्त मंत्रीपद  टिकवण्यासाठी:शिवसेनेचा आरोप

0
911
 गोवा खबर:मंत्री विजय सरदेसाई यांचा तथाकथित प्लान बी मंत्री पद आणि सत्ता टिकवण्यासाठीच्या स्वार्थापोटि असून लोकांच्या हितासाठी नाही अशी टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्लान बी पेक्षा खाण अवलंबितांच्या भल्यासाठी प्लान सी किंवा डी आखून गोंयकारपण सिध्द करायची गरज आहे असा उपरोधिक सल्ला कामत यांनी दिला आहे. सरदेसाईनी काही दिवसांपूर्वी खाण अवलंबितांच्या भल्यासाठी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली होती ती आता खरी करून दाखवण्याचे आव्हान कामत यांनी दिले आहे.
 पंतप्रधान मोदीनी काहीच सकारात्मक निर्णय घेतला नसून जे लोकप्रतिनिधी  भेटण्यासाठी गेले होते ते केवळ छायाचित्रे काढून घेण्यासाठी गेले होते अशी टीका कामत यांनी केली आहे.
 मोदी नी जर खाण अवलंबितांच्या नेत्यांना ‘ हाव ईज द जोश’ असं विचारलं असतं तर त्यांना योग्य उत्तर मिळाले असते असाही टोला कामत यांनी लगावला. प्लान बी मध्ये आमदार दिपक पावसकर सामिल असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे. सावर्डेचे आमदार पावसकर हे पक्षबदल करून मंत्रीपद मिळवणार अशी जी अफवा आहे ती सोपटे-शिरोडकर घडामोडी नंतर ‘ओपन सिक्रेट’ आहे असे मत कामत यांनी व्यक्त केली आहे.
सावर्डे मतदारसंघातील ७०% लोकं खाण अवलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करण्यापेक्षा पावसकर मंत्रीपद मिळविण्यासाठी जास्त प्रयत्नशील असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.
भाजपचा झेंडा सरकारी गाडीवर लावून फिरणे अफवा खरी असल्याचे प्रमाण आहे असा टोलाही कामत यांनी लगावला. राज्य सरचिटणीस मिलिंद गावस यांनी खाण अवलंबिताना सरकार मध्ये सामील पक्षांचे सदस्य असल्यास,अमित शहा गोवा भेटीवेळी, सामुहिक राजनामे देवून निषेध करण्याचे आवाहन केले आहे.