सरकार भ्रष्टाचाऱ्यांना शासन करत असून प्रामाणिक व्यक्तींचा आदर करत आहे-पंतप्रधान मोदी

0
1576
The Prime Minister, Shri Narendra Modi flagging off the world’s first Diesel to Electric Converted Locomotive at Diesel Locomotive Works, at Varanasi, Uttar Pradesh on February 19, 2019.

पंतप्रधानांनी दिली वाराणसीला भेट

विजेवर परिवर्तीत झालेल्या पहिल्या रेल्वे इंजिनाला दाखवला हिरवा झेंडा

गुरू रविदास जन्मस्थान विकास प्रकल्पाची पायाभरणी

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला भेट दिली. रविदास जयंतीनिमित्त त्यांनी गुरू रविदास जन्मस्थान विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.

वाराणसीतल्या डिझेल लोकोमोटिव वर्क्स येथे डिझेलहून विजेवर परिवर्तीत झालेल्या पहिल्या रेल्वे इंजिनाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. डिझेलवर चालणारी सर्व इंजिने त्यांच्या मधल्या काळात विजेवर परिवर्तीत करण्याचे भारतीय रेल्वेने ठरवले आहे. संकर्षण ऊर्जेच्या खर्चात बचत करणे आणि कार्बन उत्सर्जनात कपात करणे, यादृष्टीने हा प्रकल्प एक पाऊल पुढे आहे. भारतीय रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण अभियानांतर्गत, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स वाराणसीने डिझेल लोकोमोटिव्ह नवीन प्रोटोटाईप इलेक्ट्रीक लोकोमोटिव्हमध्ये परावर्तीत केले आहे. या लोकोमोटिव्हच्या पहाणीनंतर पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखविला.10 हजार अश्वशक्तींची दोन इंजिने डिझेल लोकोमोटीव वर्क्सने केवळ 69 दिवसात परिवर्तीत केली आहेत. हे संपूर्ण काम ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत करण्यात आले असून भारतीय संशोधन आणि विकासातून हे करण्यात आले आहे.

रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरू रविदास पुतळ्याला आदरांजली वाहिली. त्यानंतर गुरू रविदास जन्मस्थान मंदिरात, गुरू रविदास जन्मस्थान विकास प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

The Prime Minister, Shri Narendra Modi paying tributes to Guru Ravidas on his Birth Anniversary, at Varanasi, Uttar Pradesh on February 19, 2019.

वंचितांना सहाय्य करण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले, ‘गरिबांसाठी आम्ही कोट्याची तरतूद केली. त्यामुळे वंचित घटकातल्या व्यक्तीही सन्‍मानजनक आयुष्य जगू शकतील. हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना शासन करत असून प्रामाणिक व्यक्तींचा आदर करत आहे.’

समाजात जाती-आधारित भेदभाव असेल, तर समाजात एकी नांदू शकत नाही आणि लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकत नाहीत, असे पंतप्रधानांनी सांगितले. संत रविदासांची शिकवण प्रेरणादायी असून त्यांनी दाखवलेला मार्ग अनुसरण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. प्रकल्पाचा भाग म्हणून पुतळ्याभोवती बगीचा बांधला जाईल आणि यात्रेकरूंना सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवल्या जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले.