सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्या:आप

0
1055

गोवाखबर: खाणींचा प्रश्न मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहाजरीत भाजप आघडी सरकारला सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करून खाण अवलंबीतांना केंद्र सरकार मार्फत मदत देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी केली आहे.16 मार्च पासून खाणी बंद झाल्या तर खाण अवलंबित आर्थिक संकटात सापडणार आहेत.मुख्यमंत्री पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असल्याने राज्यात घटनात्म पेच प्रसंग निर्माण झाला आहे.भाजप आघाडी सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
भाजप आघाडी सरकार पहिल्या वर्षात सगळ्याच पातळ्यांवर अपयशी:आप
आम आदमी पक्षाने  भाजप आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.आज शिवसेनेने देखील खाणींचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश येत असल्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 16 मार्च पासून राज्यातील सगळ्या खाणी बंद कराव्या लागणार आहेत.खाणी बंद पडल्या तर राज्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्या वरील आजाराच्या उपचारासाठी सध्या अमेरिकेत आहेत.त्यांच्या गैरहाजरीत राज्यकारभाराची सूत्रे असलेल्या विजय सरदेसाई,सुदिन ढवळीकर आणि फ्रांसिस डिसोझा यांच्याकडे मर्यादित अधिकार असल्याने राज्यात घटनात्मक पेच प्रसंग ओढवला आहे.खाणींचा विषय गंभीर असून त्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता सरकार कडे नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारने खाण अवलंबीतांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेने पाठोपाठ भाजप आघाडी सरकार पहिल्या वर्षात सगळ्याच पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्या ऐवजी भाजप आघाडी सरकार बरखास्त करून नव्याने निवडणूका घ्या,अशी मागणी आम आदमी पक्षाने आज केली.