सरकार जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील – मुख्यमंत्री

0
423

 गोवा खबर:राज्य सरकार जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत संवेदनशील असून जनतेच्या सोयीसाठी आरोग्य क्षेत्रात सरकारने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. सरकारची दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना ही राज्यातील सर्वसामान्यासाठी वरदान ठरत असून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी कुडणे- साखळी येथे केले.

      कुडणे येथे महालक्ष्मी हायस्कुलमध्ये ओंकार क्रियेशन्स या संस्थेतर्फे मणिपाल हॉस्पीटल, गोवा कॅन्सर सोसायटी व गोवा दंत महाविध्यालय यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित केलेल्या कॅन्सर संबंधित जागृती शिबीर व मोफत तपासणी या कार्यक्रमाच्या उद्घाटप्रसंगी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      याप्रसंगी व्यासपिठावर मणिपाल हॉस्पीटलचे डॉ शेखर साळकर, गोवा दंत महाविध्यालयाच्या डॉ अमिता केंकरे कामत, स्थानिक सरपंच जयराम मळीक, महालक्ष्मी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संतोष मळीक, संस्थेच्या अध्यक्षा निशा पोकळे उपस्थित होत्या.

      पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले की राज्य सरकार आरोग्य क्षेत्राकडे गांभिर्याने पाहत आहे. राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी अनेक योजना विविध ग्रामीण भागात मार्गी लावलेल्या आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आत्याधुनिक बनविण्याकडे सरकारचा कल असून राज्यातील जनता सुखी- समृध्द व निरोगी रहावी यासाठी विध्यमान सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यानी यावेळी केले. याप्रसंगी डॉ शेखर साळकर व संतोष मळीक यानी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.