सरकारी शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट

0
775
गोवा खबर:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत.जर आयोजित केले तर राज्य सरकारने तेथे कोरोना संसर्गाबद्दल खबरदारी घ्यावी,अशा स्पष्ट सूचना दिल्यामुळे सरकारी पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या शिमगोत्सवावर अनिश्चिततेची छाया पडली आहे.
राज्यात पर्यटन खात्यातर्फे राजधानी पणजीसह प्रमुख शहरांमध्ये शिमगोत्सवाचे आयोजन केले जाते.हा शिमगोत्सव पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांप्रमाणे स्थानिक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.
शिमगोत्सवाचे आयोजन करायचे झाल्यास एकाच वेळी सुमारे २० हजार लोकांच्या स्वच्छतेविषयी सरकारी यंत्रणेला काळजी घ्यावी लागणार आहे.तेवढी यंत्रणा नसेल तर ते संकटाला निमंत्रण देण्यासारखे ठरणार आहे.

दरम्यान,कोरानो व्हायरस विषयी गोवा  सरकार तसेच आरोग्य खाते सर्व ती काळजी घेत आहे. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. लोकांनी कोरोना विषयी थोडी सतर्कता बाळगून केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.यापार्श्वभूमीवर पर्यटन खाते शिमगोत्सवाबाबत कोणता निर्णय घेते याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
 कोराना विषयी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांना निर्देश दिले आहेत. यात त्यांनी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे सांगितले आहे.
गोवा  आरोग्य खात्याने याची दखल घेतली आहे. आम्ही याविषयी विमानतळ अधिकारी तसेच पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यात आम्ही त्यांना देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची खास तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच राज्यात देशी पर्यटक रेल्वे स्टेशनमधून येतात त्यामुळे आम्ही केंद सरकारकडे या तपासणीसाठी आणखी यंत्रणाही मागितली आहे. दोन तीन महिने आम्हाला याविषयी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. याचा जरी पर्यटनाला फटका बसला तरी कोराना वायरस पासून मुक्ती मिळविण्यासाठी आम्हाला, असे करावे लागणार आहे, असे यावेळी आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.
 सर्व देशांनी कोराना विषयी सतर्कता बाळगली आहे. प्रत्येक देशात पर्यटकांची तपासणी केली जात आहे. तसेच अनेक लोकांनी परदेशातील सहली रद्द केल्या  आहेत. आम्ही गोमंतकीयांनी काही महिने या व्हायरस विषयी जागरुक राहून केंद सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे. आरोग्य खाते या विषयी सर्व ती खबरदारी घेत आहे, असे  आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 कोराना विषयी सोशल मिडीयावर अनेक अफवा येत आहेत या अफवांना बळी पडू नका. गोव्यात फक्त चार संशयित रुग्ण गोमेकॉमध्ये आहेत. यातील दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दोन संशयीत रुग्ण आहेत आरोग्य खात्याच्या देखरेखी खाली त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही या विषयी खोटी माहिती पसरवत आहे त्यांना बळी पडू नका, असे आवाहन यावेळी आरोग्य मंत्र्यांनी केले.