सरकारी नोकऱ्या दलाल  विकत आहेत: आपचा आरोप

0
1053
 गोवा खबर:आजच्या परिस्थितीत सरकारी नोकरीसाठी ईच्छा ठेवणाऱ्या तरुणांनी  सावधगिरी बाळगायला हवी कारण वेगवेगळ्या खात्यांतर्फे पैसे घेऊन नोकरी विकणारे सरकारी दलाल मोकाट सुटले आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
 सध्या गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना नोकरी कठीण झाले आहे असा आरोप आप गोवा संयोजक एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत केला.
 सरकारी कार्यालयांसमेर हजारोंच्या संख्येने उभे राहून सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज घेणे, तो भरुन देणे हे सर्व आजच्या  युगात तरुणांना करावे लागते हे लज्जास्पद आहे व आयटी पार्कच्या घोषणा करणाऱ्या सरकारला ही प्रक्रिया ऑनलाईन करणे शक्य होत नसल्याबद्दल गोम्स यानी जोरदार टिका केली.
 या सरकारला पारदर्शकता हे काय असते ते ठाऊक नाही असे खेदाने सांगत नोकरीसाठी येणाऱ्यांकडे मंत्र्यांच्या आशीर्वादाने पोसुन ठेवलेल्या दलालांमार्फत लाखो रुपयांची मागणी करण्यात येते असा आरोप गोम्स यानी केला.
 नवीन परंपरेप्रमाणे मंत्री जास्तीत जास्त नोकऱ्या आपल्याच मतदारसंघात देत असल्यामुळे हुशार मुले वंचित होत आहे असे त्यानी नजरेस आणुन दिले. जर आपल्याच  मतदारसंघातील मुलांना नोकऱ्या द्यायचे ठरविले आहे तर जाहिराती देउन इतरांना वणवण कां करु लावता, असा प्रश्न एल्विस गोम्स यानी केला.
“आरोग्य आणि वीज खात्यामध्ये या आधी नोकरी कशा तऱ्हेने दिली जात होती त्याचा  उल्लेख करुन त्यानी आपल्या या आरोपांचे समर्थन केले. आरोग्य खात्यात फार्मसी पदासाठी 8 रिक्त जागा भरताना सत्तरीतील 6 उमेदवार पात्र ठरले तर वीज खात्यात ईंजीनीयर्सच्या एकुण रिक्त जागांतील 30 ते 35 टक्के फक्त कुडचडे येथील युवकांना दिली असे त्यानी म्हटले. हे याग्य नाही”, असे एल्विस गोम्स पुढे म्हणाले.
निवडणुकांवर लक्ष ठेऊन नोकर भरती प्रकिया सुरु केल्याचे सरकार भासवत असुन तरुणानी सतर्क राहावे असे आवाहन गोवा आम आदमी पार्टीचे सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यानी केले.
आपल्याच मतदारसंघातील तरुणांना नोकऱ्या देण्याचा जो पायंडा विद्यमान सरकारने घातला आहे तो पाहाता ज्या मतदारसंघातील आमदार मंत्री नाही तसेच 3 मोकळ्या झालेल्या मतदारसंघात आमदार नाहीत त्या क्षेत्रातील तरुणांनी नोकऱ्यां मिळणार नाहीत हे लक्षात घेउन अर्ज करु पाहाणाऱ्यानी मनाची तयारी करावी असे पाडगांवकर यानी सुचवले.