सरकारने कोविड-१९ वर अवलंविलेले सक्रीय उपाय

0
44

सरकारने नवीन पायाभूत सुविधा तयार करून त्याचप्रमाणे विविध माध्यमांचा वापर करून उपलब्ध सुविधांसंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण करून साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध उपाय अवलंबिले आहेत.

द्रव्य वैध्यकिय ऑक्सिजन

राज्य सरकार, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या विनंतीवरून भारत  सरकारने लिंडे बेलॉक्सीकडून एलएमओचे २० एमटी अतिरिक्त वापर केला असून एकूण पूरवठा ४६ एमटीपर्यंत वाढविला आहे.

ऑक्सीजन जनरेशन प्रकल्प स्थापण्याची योजना

जीएसआयडीव्दारे जीएमसीमध्ये एक पीएसए प्रकल्प स्थापण्यात आला असून तो कार्यान्वित होण्याच्या वाटेवर आहे.

मडगांव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी प्रधानमंत्री केयर निधीतून ६०० एलपीएम क्षमतेचा पीएमए ऑक्सीजन जनरेशन प्रकल्प मिळविला आहे. तथापि तो उभारण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी कॉम्प्रेसरच्या वितरणाची प्रतिक्षा आहे.

एनजीडीएच म्हापसा (१०० एलपीएम) ईएसआय इस्पितळ (१०० एलपीएम) साठी प्रधानमंत्री केयर फंडाअंतर्गत अधिक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्पाची विनंती करण्यात आली आहे आणि त्याच्या वितरणाची ७ जूनपर्यंत अपेक्षा आहे.

गोवा वैध्यकिय महाविध्यालयात उभारलेला सुपर स्पेशालिटी ब्लॉक

कोविड-१९ च्या रूग्णांना प्रवेश देण्यासाठी ८ मे रोजी गोवा वैध्यकिय महाविध्यालयातील सुपर स्पेशालीटी ब्लॉक अंशतः तयार करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सुमारे २७ रूग्णांपर्यंत वाढ झाली. ज्यात नवीन प्रवेश घेतलेल्या आणि विध्यमान रूग्णांना जीएमसीमधून हलविण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसएसबी मध्ये पूरेशा खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४३६ ऑक्सीजन पोर्टसह बेडची क्षमता असून एकूण ५५२ ऑक्सीजन पोर्ट व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्ससह उपलब्ध आहेत.

लसीकरण धोरण

आतापर्यंत गोवा राज्याला भारत सरकारकडून सुमारे ७,३१,७२० डोस प्राप्त झाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ६.५ लाख लोकसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने घोषित किमतीत भारत सरकारच्या धोरणानुसार सिरम इन्स्टीट्युट कडून कोविशिल्ड लसीचे ५ लाख डोस घेतले. त्यापैकी पहिल्या लॉटमध्ये ३२, ८७० डोस प्राप्त झाले. ही पहिली तुकडी एका आठवड्यातच संपली आहे. या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासाठी जून २०२१ च्या संपूर्ण महिन्यासाठी ३६,५८० डोस देण्यात आले आहेत आणि आपले उद्दिष्ठ साधण्यास ती पुरेशी नाही.

त्यामुळे सरकारने इतर सरकार मान्य उत्पादकांकडून लसी खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक येथून कोवॅक्सीन लसीचे २ लाख डोस खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. मुलांसाठी लसी खरेदी करण्याच्या भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची प्रतिक्षा आहे. ०-१८ वयोगटातील व्यक्तींची अंदाजे ४.६५ लाख एवढी लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणे लसी खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरींगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

समर्पित्त रूग्णालये/बाल रोग वॉर्ड, नवजात आयसीयु, बालरोग आयसीयु आणि इतर औषधे

जीएमसी आणि इतर इस्पितळांतील बाल रोग वॉर्ड, ऑक्सीजन बेड, नवजात आयसीयु, बालरोग आयसीयु रूग्णांसह प्रवेश देण्यात आलेल्या रूग्णांची सविस्तर माहिती पुढीलप्रमणेः-

उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ

असिम्टोमेटिक मुलांवर गृह देखरेखीसाठी वैधकिय अधिकारीं आणि इतर आयएमए /आयएपी डॉक्टरांसाठी प्रशिक्षण. एसएनसीयुतील पांच खाटा तेथे ठेवण्यात येतील अतिरिक्त ५ खाटा एसएनसीयु आणि पोस्टनेटल केयरसाठी तयार ठेवण्यात येतील.

मडगांव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ. ईरा आल्मेदा या तज्ञ समितीच्या सदस्य आहेत.

एसएनसीयु, पेडियाट्रीक वॉर्ड (सध्या प्रौढ प्रवेशासाठी वापरला जातो) स्थापन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. ७० बालरोग खाटा (ओटीसह) ६ पीआयसीयु खाटा आणि १२ एसएनसीयु खाटांचे वाटप करण्यात आले आहे.

मडगांव येथील हॉस्पिसियो इस्पितळातील बालरोग तज्ञ आणि परिचारिकांसाठी वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ. ईरा आल्मेदा यांच्याव्दारे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे एमएसडी आणि डीएचएसकडून दिली जातील.

अतिरिक्त कर्मचारी भरती आणि प्रोत्साहन

अतिरिक्त कर्मचारी-डॉक्टर, परिचारिका तंत्रज्ञ इत्यादींची भरती करण्याच्या योजनेसंदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाखाली कोविड व्यवस्थापनासाठी सुमारे ५६७ डॉक्टर्स, नर्स आणि तंत्रज्ञ व एमटीएस कर्मचा-यांची कॉन्ट्रेक्ट तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मनुष्यबळाची कमतरता नाही आहे. अतिरिक्त कर्मचारी पदांसाठी कॉन्ट्रेक्ट नियुक्तीवर जाहिरात दिली होती आणि मुलाखतीव्दारे पदे भरण्यात आली.

गोवा वैध्यकिय महाविध्यालयासंदर्भात, गोवा वैध्यकिय महाविध्यालय, गोवा दंत महाविध्यालय आणि ईएसआयमधील डॉक्टर्सची कोविड कामासाठी रोटेशनल तत्वांवर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पीजी ज्युनियर रेसिडेन्ट डॉक्टर्संना रोटेशनल तत्वावर कोविड ड्युटीसाठी तैनात करण्यात आले आहेत. एकूण २७० पीजी ज्युनियर्स आहेत. त्याचप्रमाणे अतिरिक्त १३४ एमबीबीएस उत्तीर्णांची कोविड टास्क फोर्ससाठी बॉंड सेवेखाली नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवा मेडिकल कॉलेज, गोवा दंत महाविध्यालयामधील स्टाफ नर्सेसची कोविड ड्युटीवर नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे ४०० नवीन स्टाफ नर्सेसची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त ७ तंत्रज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ईएसआयमधील १२ फर्मासीस्टची कोविड ड्युटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ४०० एमटीएसची भरती करण्यात आली आहे. जीएमसीतील एमटीएस कर्मचा-यांची कोविड ड्युटीसाठी भरती करण्यात आली आहे.

तिस-या लाटेसाठी टास्क फोर्स

सरकारने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली आहे. ज्यामध्ये कोविड-१९ साथीच्या संभाव्य तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी व धोरण आखण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी सरकारी आणि खाजगी इस्पितळांच्या बालरोगतज्ञांचा समावेश आहे. २१ मे रोजी या समितीची पहिली बैठक संपन्न झाली.

याशिवाय गोवा वैध्यकिय महाविध्यालयाच्या डीनच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीचीही स्थापना करण्यात आली ज्यात आरोग्य सेवा संचालक व इतर समितीचे सदस्य आहेत. २२ मे रोजी तज्ञ समितीची बैठक घेण्यात आली होती.

म्युकर मायकोसीस

२५ मे पर्यंत जीएमसीमध्ये एकूण ९ म्युकर मायकोसीस प्रकरणे नोंद झाली आहेत. जीएमसीच्या मतानुसार म्युकर मायकोसिस मुळे थेट मृत्यू न झाल्याचे नोंद आहे. त्याप्रमाणे आरोग्य सेवा संचालनालयाखालील इस्पितळामध्ये म्युकर मायकोसीसमुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.

गोवा वैध्यकीय महाविध्यालयाच्या डीननी म्युकर मायकोसीस हाताळण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सची बैठकही घेण्यात आली आहे.

जीएमसीच्या इतर तज्ञ आणि सुपर स्पेशालिठीस्टच्या सहकार्याने जीएमसीच्या ईएनटी विभागाने म्युकर मायकोसीसच्या व्यवस्थापनासाठी एक शिष्टाचार तयार केला आहे. जो इंडियन अकादमी ऑफ ओटोराइनोलॅरिम्गोलॉजीने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहे.

अशा रूग्णांवर उपचार करण्यासाठी जीएमसीमध्ये ३० बेड क्षमतेचा विशेष वॉर्ड क्रमांक १०२ सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी विविध व्यापक विशेषता आणि सुपर स्पेशालिटी विभागातील डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एंडोस्कॉपी आणि स्टेनिंग सुविधांसह म्युकर मायकोसीसच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पुरेसा औषध साठा असून अतिरिक्त आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा इस्पितळांमध्ये संशयित प्रकणांसाठी बेड्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा संचालनालयाखाली वरिष्ठ ईएनटी, वरिष्ठ ओफ्तालमोलॉजीस्ट, वरिष्ठ फिजिशियन यांच्या शल्यचिकीत्सा प्रक्रियेत समावेश आहे.

आयव्हरमॅक्टिन

सध्या आयव्हरमॅक्टीन सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या व सिम्टोमेटिक रूग्णांना दिले जाते आणि होम आयजोलेशन किटमध्येही उपलब्ध केले आहे. आरोग्यमंत्र्यांत्या अध्यक्षतेखाली १३ मे रोजी कोविडच्या राज्य तज्ञ समितीची बैठक संपन्न झाली. त्यात सरकारी व खासगी संस्थेचे तज्ञ सहभागी झाले होते. विचार विनिमयानंतर गर्भवती, स्तनपान करणा-या माता वगळता राज्यातील संपूर्ण १८ वर्षांवरील व्यक्तींना दररोज ५ दिवसांसाठी आयव्हरमेक्टीन १२ मिलीग्रॅम वापरण्याची शिफारस करण्यात आली. ज्यांना एलर्जी आहे किंवा ज्यांना यकृत, मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरोग्य सेवा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध देशांमध्ये जगभरात अभ्यास केला जातो ज्यात रूग्णांवर प्रतिबंध व उपचारांवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. ही माहिती https://ivmmeta.com वर उपलब्ध आहे. हे औषध देताना रूग्णांना साईड इफेक्टची माहिती देण्यात येते.