सरकारच्या अपयशामुळे गोवा झाला कोविडचा ‘निर्यातदार’ : म्हार्दोळकर

0
141
गोवा खबर : गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सोमवारी भाजपा सरकारवर जोरदारपणे टिका करताना कोविडचा सामना करण्यास असमर्थ ठरलेले  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ऱाज्याला कॉव्हिडचा निर्यातदार केला आहे असे म्हटले.
म्हार्दोळकर यांनी सोमवारी कॉंग्रेस हाऊस-पणजी येथे पत्रकार परिषद घेवून, कोव्हिड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि गोव्यातील कोविड प्रकारांचा ओघ थांबविण्यासाठी राज्य सरकारने त्वरित आरटी-पीसीआर चाचणी करावी अशी मागणी केली.
 “गोव्यात प्रवेश करणाऱ्यासाठी ही चाचणी सक्तीची केली पाहिजे.” असे ते म्हणाले.
सांत आंद्रे युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष साईश आरोसकर, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अर्चित  नाईक आणि ग्लेन काब्राल यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारच्या एसओपी आणि मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ घेत, गोवा राज्य संसर्गजन्य मूळ ठिकाण असल्याचे महाराष्ट्रने म्हटल्याने, म्हार्दोळकर म्हणाले की, अहंकारी भाजपा सरकारने ही परिस्थिती निर्माण केली आहे, जिथे गोवा आता कोविडचा ‘निर्यातदार’ झाला आहे.
ते म्हणाले की कोविडची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने गोव्याला आंतरराज्यीय प्रवाश्यांबाबतचे नियम सुधारण्याची आवश्यकता आहे. राज्याबाहेरून गोव्यात प्रवेश करणाऱ्याना राज्यात येण्यापूर्वी किंवा नंतर आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली पाहिजे असे त्यांनी सुचवले.
“ वाढती कोविडची सत्यता लक्षात घेऊन इतर राज्यांनी ही चाचणी अंमलात आणली आहे.” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
ऱाज्य सरकारने जीएमसीचा सुपर स्पेशलिटी ब्लॉक कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली.
“या ब्लॉकचे खाजगीकरण करण्याची सरकारची योजना असू शकते, परंतु आजची परिस्थिती समजून घेत त्यांनी लोकांच्या हिताचा विचार केला पाहिजे.” असे वरद म्हार्दोळकर म्हणाले.
“होम कॉरंटाईन झालेल्यांना वैद्यकीय किट पुरवाव्यात, याशिवाय चाचणी अहवाल त्वरित देण्यात यावा.” असे ते पुढे म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापन योजना मदत करण्यासाठी राबविली जात नाही, असे त्यांनी नमूद केले.
“सरकारने लग्नांमध्ये मेळाव्यांना प्रतिबंधित केले आहे, परंतु कॅसिनोमधील गर्दी प्रतिबंधित केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. ” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की कोविड प्रकरणात नुकत्याच झालेल्या वाढीसाठी सरकार जबाबदार आहे कारण कोणतेही निर्बंध, एसओपी आणि गंभीरता सरकारला नाही.
 “सध्या पोजिटिव्ह  दर 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ, जर सर्वांची चाचणी केली तर राज्यातील 5 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होइल. ह्या  परिस्थितीवर मात करण्यासाठी आमच्याकडे वैद्यकीय सुविधा आहेत का? ” असा प्रश्न त्यांनी केला.
यावर मात करण्यासाठी 419 बेडची क्षमता पुरेशी नाही. अशी काही प्रकरणे आहेत ज्यात  रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागले. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री कोविडबद्दल लोकांना दोष देत आहेत, परंतु जर लोक चाचणीसाठी गेले तर अहवाल लवकर मिळत नाही अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.
गोव्यातील विषाणूच्या पहिल्या लाटेविषयी बोलताना म्हार्दोळकर म्हणाले की, त्यावेळी पुरेसा वेळ असूनही ‘अति आत्मविश्वासाने’ बुद्धिमत्ता नसलेले भाजपा सरकार कोविड केअर सुविधा तयार करण्यात अपयशी ठरले आणि गोव्यात ‘शून्य’ प्रकरणांचा गर्व करताना दिसले. तथापि, हा ‘बढाई मारणारा काळ’ लवकरच कोविड प्रकरणांमध्ये वाढीस लागला.
“आता ही दुसरी लाट असल्याचे आणि प्रत्येक दिवसात प्रकरणे वाढत आहेत हे जाणून असूनही हे भ्रष्ट सरकार जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरले आहे.” असे म्हार्दोळकर म्हणाले.
“टीका उत्सवाच्या कार्यक्रमाचा राजकीय कार्यक्रमात रूपांतर करण्याचा भाजपच्या आमदारांनी कसा गैरवापर केला हे लोकांनी पाहिले आहे. टीका उत्सव मध्ये सामाजिक अंतर निश्चित करण्यात सरकार अपयशी ठरले, तरी भाजपचे आमदार आणि मंत्र्यांना त्यातून राजकीय मायलेज घेण्याची संधी मिळाली.” असे म्हार्दोळकर म्हणाले.
राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन म्हार्दोळकर यांनी केले आहे.
 “सध्या ही प्रकरणे फक्त शहरांमध्येच दिसतात. त्याचा प्रसार गावात होवू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.” असे ते म्हणाले.