सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी कार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकाऱ्यांना आवाहन

0
487

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनसंपर्क अधिकारी आणि सरकारी खात्यांतील प्रमुखांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया अशा मुख्य व्यासपीठावर येणाऱ्या प्रतिकूल प्रसिद्धीचा प्रतिकार करण्यासाठी व सकारात्मक आशय निर्माण करण्यासाठी योग्य नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. या प्रयत्नांमुळे सरकारच्या कार्याची आणि उपक्रमांची माहिती मिळविण्यास आणि पुढील सहा महिन्यांत योग्य दृष्टीकोनातून त्यांची सकारात्मक प्रतिमा विकसित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असेही ते म्हणाले.

पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात माहिती व प्रसिद्धी खात्याने पीआरओ, एचओडी आणि ओएसडीना त्याना त्यांची भूमिका व जबाबदाऱीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्र्यानी अचुक बातम्या तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. आपले सरकार राज्य आणि लोकांच्या हितासाठी काम करीत आहे असा भक्कम संदेश देऊन विश्वासार्हता मिळविण्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी पीआरओंनी सरकारवरील टीकेला तोंड देण्यासाठी स्पष्टीकरण  व खंडन करण्यासाठी आवश्यक माहिती आठ दिवसांनंतर प्रकाशित करण्याऐवजी दुसर्‍याच दिवशी प्रकाशित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्रिंट मीडियाबरोबरच सरकारी खात्यानी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचा अधिकाधिक उपयोग करावा ज्यामुळे श्रोते व दर्शकांची संख्या चांगली निर्माण होईल आणि कोविड -१९ महामारीच्या काळात आवश्यक जागृती निर्माण करण्यासाठी रेडिओ माध्यमाने निर्णायक व महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचा आपण उत्तम प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि या संदर्भात त्यांनी सत्तरी तालुक्यातील केरी येथील चेक पोस्टला दिलेल्या अलिकडच्या भेटीचा उल्लेख केला ज्यामध्ये प्रिंट आणि इतर माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली असे ते म्हणाले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मुख्यमंत्र्यांनी खात्यांतील कॅलेंडरचे कार्यक्रम माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार ठेवण्याची गरज व्यक्त केली. माहिती व प्रसिद्धी खाते आणि मुख्यमंत्री कार्यालय सकारात्मक गोष्टी जाहीर करण्यासाठी पीआरओना सहकार्य देतील. पीआरओ सकारात्मक निवेदनातही योगदान देऊ शकतात. त्यांनी सकारात्मक बाबींवरही विचार करावा आणि प्रतिकूल प्रसिद्धीला उत्तर द्यावे असेही ते म्हणाले.

पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक श्री विनोद कुमार डी.व्ही आयआयएस यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना  माहिती युगातील सत्यता यासंबंधी पीआरओनी स्वता माहिती करून घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की विकासाच्या मुख्य प्रवाहात पीआरओचे काम महत्त्वपूर्ण आहे. डिजिटल किंवा प्रिंट अशा दळणवळणाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला त्यांनी पीआरओना दिला. त्यांनी निरीक्षण, अभिमुख, निर्णय आणि कार्य या चार बाबींवर भर दिला. पीआरओना त्यांच्या संबंधित खात्यांचे सखोल ज्ञान असावे असे ते म्हणाले.

सोशल मीडियासंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव श्री गौरीश कळंगुटकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांना सहज उपलब्ध असून त्याद्वारे कोणतीही व्यक्ती आपले मत व्यक्त करू शकते असे सांगितले. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यावर त्यांनी भर दिला ज्यायोगे सरकारला त्याचा फायदा होईल. सर्वसामान्यांच्या आणि सरकारच्या नजरेत आपली सकारात्मक प्रतिमा विकसित करण्यासाठी सरकारचे महत्त्वपूर्ण टप्पे आणि कार्याशी संबंधित निर्मितीवरही ते बोलत होते. माध्यमांतून समोर येणाऱ्या टिकात्मक अहवालावर त्वरित कार्य करण्यासाठी खात्यांतील अंतर्गत समन्वयाला महत्व असल्याचे ते म्हणाले.

माहिती व प्रसिद्धी खात्याचे सहाय्यक माहिती अधिकारी श्री श्याम गावकर यांनी सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी सदर खाते कसे काम करीत आहे याची सविस्तर माहिती दिली.

आपल्या स्वागतपर भाषणात माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री दिपक बांदेकर यानी विविध सरकारी खाते, महामंडळे आणि स्वायत्त संस्था यांच्याशी अधिक चांगले समन्वय असणे हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तात्काळ माहिती मिळविण्यासाठी सदर खात्याने पीआरओ आणि एचओडी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक समर्पित पथक सुरू केल्याची माहिती दिली.

साहाय्यक माहिती अधिकारी श्री श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले.