सरकारकडून विधवांसाठी असलेला ना हरकत दाखला रद्द

0
604

 गोवा खबर:उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर विधवाना सही करायला लागणारा ना हरकत दाखला सरकारने तांतडीने रद्द केला आहे. या आदेशामुळे राज्यातील तसेच परदेशात राहणाऱ्य़ा विधवाना व लोकांना मोठा दिलासा मिळेल. महसूलमंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात, सचिव  संजय कुमार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नामुळे हा आदेश ३१ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे.

३१ ऑक्टोबर २०१९ रोजी हा आदेश लागू करण्यात आला असून अशाप्रकारची जमीन व्यवहारासंदर्भातील सर्व परिपत्रके, आदेश आणि सूचना मागे घेण्यात आल्या आहेत. त्यात जमीन विक्री, देणगी, म्युटेशन, विधवाकडून मुखत्यार पत्र याचा समावेश आहे.

महसूलमंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात आणि महसूल सचिव श्री संजय कुमार यांच्यासमोर विविध संस्था आणि तत्संबंधित सामान्य लोकांनी या विषयावर चर्चा केली हेती.