समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक वाटप प्रक्रिया वेळेवर – पर्यटन मंत्री आजगांवकर

0
914

 

पणजी: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शॅक चालकांना २०१७- १८ च्या पर्यटन हंगामासाठीच्या शॅक वाटप प्रक्रियेचे काम जलद
गतीने सुरू असल्याची ग्वाही  पर्यटन मंत्री  मनोहर आजगांवकर यांनी आज दिली, म्हणजे चालकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पर्यटनाच्या पूर्ण हंगामात व्यवसाय करणे शक्य होईल. २०१७- १८ च्या पर्यटन हंगमासाठीची शॅक वाटप प्रक्रिया चार सप्टेंबरपासून सुरू होणार असून २० सप्टेंबर २०१७ रोजी पूर्ण होईल.नव्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वाटप प्रक्रिया पुढील आठवड्यापासून वेळेत सुरू करण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल श्री. आजगांवकर यांनी आज नवे पर्यटन संचालक श्री. मॅनिनो डिसूझा आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. आजगांवकर म्हणाले, ‘शॅक वाटप प्रक्रिया पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या सूचना मी पर्यटन खात्याला दिल्या आहेत.’
शॅक वाटपाची संपूर्ण प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली जाणार असून शॅक चालक त्यासाठी लागणारी आवश्यक
कागदपत्रे आणि इतर नियमांचे पालन करतील याकडे पर्यटन खात्याचे लक्ष असेल, म्हणजे शॅकचे काम चांगल्या
पद्धतीने चालू शकेल.’
आजगांवकर यांनी शॅक चालकांना पर्यावरणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचे आणि पर्यायाने
समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखण्याचे आव्हान केले आहे. त्यांनी शॅक चालकांना अधिकृ पद्धतीने व्यवसाय
करण्याच्या आणि कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.