समाजाच्या मदतीसाठी बीएनआय गोवाचा साथीच्या रोगविरोधात लढा

0
702

 

दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

गोवा खबर : कोविड १९ च्या प्रसारामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. आणि या साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत भारत सक्रीयतेने कार्यरत असून गोव्यासारखे राज्यही अतिशय चांगले काम करून लक्ष वेधत आहे. व्यवसायांना नव्याने परिभाषित करणे आणि या कठीण परिस्थितीत लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बीएनआय गोवाकडून व्यवसाय क्षेत्राची सामान्यपणे पुनर्रचना करण्यासाठीचा हातभार लावला जात आहे. लॉकडाऊनच्या या काळात नाविन्यपूर्ण साप्ताहिक ऑनलाइन मीटिंग तर होतातच पण संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या सेवा पोहचविण्याचे कामही केले जात आहे. १३ विभागातून आणि ५५० पेक्षा अधिक सदस्यांच्या मदतीने लोकांना विविध पातळीवर मदत पोहचविण्याचे कार्य बीएनआयने केले आहे. त्यांच्या सदस्यांनी केलेल्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये अशी की प्रवासी, कामगार आणि गरजू तसेच भटक्या प्राण्यांना दररोज शिजवलेले जेवण देण्यात आले. या उपक्रमासाठी त्यांना प्लॅनेट हॉलीवूड, ह्यूमन वेलफेयर ट्रस्ट, लंगर फॉर हंगर आणि शीख यूथ पर्वरी यांनी सढळ मदत केली. या टाळेबंदीच्या पहिल्या ३० दिवसांच्या कलावधील त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख लोकांना शिजवलेले अन्न देण्यात आले.

गरजूंना अन्नधान्याच्या पिशव्याही पुरविण्यात आल्या. यासाठी त्यांना ह्युमॅनीटेरिअन रिलिफ संस्थनेही मदत केली. यावेळी दहा हजारपेक्षा अधिक घरांमध्ये अन्नधान्याच्या पिशव्या पोहच करण्यात आल्या. बीएनआय गोवाच्या सदस्यांनी टी.बी. इस्पितळ आणि मडगाव येथील इएसआय इस्पितळात कित्येक लिटर हँड वॉश आणि फ्लोर क्लीनर, हजारो पेपर प्लेट्स, टिशू पेपर आणि पेपर कपसुद्धा पुरवले. सरकारी यंत्रणा आणि इतर रुग्णालये आणि संस्था यांनी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे कौतुक केले आहे. बीएनआय गोवा आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशनने आपले सदस्य आणि हितचिंतकांच्या माध्यमातून डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या फ्रंटलाइन वॉरियर्ससाठी 1025 पीपीई किट गोव्याच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत. हि मदत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामार्फत पोहचवली.

बीएनआय- गोवा यांनी नुकताच दहावा वर्धापन दिन साजरा केला आणि या खास प्रसंगी बीएनआय गोवाचे कार्यकारी संचालक श्री. राजकुमार कामत यांनी घेतलेल्या ऑनलाईन उपक्रमासाठी सुमारे ४५० पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या घरातून उपस्थिती दर्शविली. जागतिक दर्जा असणाऱ्या या उपक्रमामध्ये मॅक श्रीनिवासन, मुरली श्रीनिवासन, डॉ. जगत शहा आणि नितीन कुंकळयेकर असे चार वक्ते होते, ज्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून अनेकांना उत्साहित केले.

बीएनआय ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रॅहम वेहमिलर यांनीही बीएनआय गोवा विभागाच्या सदस्यांना व्हिडिओ संदेश पाठविला. वेहमिलर म्हणाले, “बी.एन.आय. गोवा नियम पाळत ज्यापध्दतीने उत्कृष्ट कार्य करीत आहे, ते पाहून तमी फार प्रभावित झालो आहे आणि गोवा एक छोटा प्रदेश असूनही तो उंच आणि अभिमानाने उभा आहे आणि जागतिक पातळीवर अनुकूल असलेल्या अनेक यंत्रणा बसविण्यास मदत करीत असल्याचे वेहमिलर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही बीएनआय गोवाच्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल अभिनंदन केले. केवळ व्यवसाय वाढविण्यातच नव्हे तर रोजगार निर्मितीतही त्यांनी गोव्याच्या औद्योगिक व इतर विकासाच्या क्षेत्रातील बीएनच्या गुंतवणूकीसाठीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच एका संस्थेच्या रूपात बीएनआयने मदतकार्य राबविण्यामध्ये कशाप्रकारे पुढाकार घेतला आणि त्यांच्या सदस्यांद्वारे प्रभावी कामगिरी केली आणि अडीच लाखपेक्षा जास्त लोकांना शिजलेले जेवण, असंख्य अन्नधान्य पाकिटे पुरविण्यासारख्या योग्य सेवांचा उल्लेख करून स्थानिक यंत्रणा व संस्थांना प्रत्यक्षात पोचण्यास मदत केली असल्याचे सांगत मुखमंत्र्यांनी बीएनआयच्या कामाचे कौतुक केले. अडकलेल्या स्थलांतरित, गरजू लोक आणि गोव्यातील अग्रगामी आरोग्यसेवा देण्यासाठी त्यांनी हातभार लावला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

या कार्यक्रमात गोवा बीएनआयच्या सर्व 13 विभागातील मागील सहा महिन्यांच्या कामगिरीसाठी वैयक्तिक तसेच विभागीय पुरस्कारही देण्यात आले.

या सायंकाळचे मुख्य आकर्षण म्हणजे गिव्हर्स ऑफ द डिकेड हा पुरस्कार होता जो वैयक्तिक तसेच विभागांना देण्यात येतो. श्री. मनोज पाटील आणि आर्किटेक्ट अविनाश बोरकर यांना अनुक्रमे उत्तर गोवा आणि दक्षिण’ गोवासाठी देण्यात आले.