सप्टेंबर महिन्याचा रेशन कोटा

0
795

गोवा खबर:सप्टेंबर महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना ३ रूपये दराने ३५ किलो तांदूळ आणि १३.५० रूपये दराने १ किलो साखर प्रतिकार्ड देण्यात येईल, तर प्राधान्यक्रम कुटुंबांना ३ रूपय दराने प्रती माणसी ५ किलो तांदूळ देण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना १२.५० रूपये दराने १० किलो तांदूळ आणि १० रूपये दराने ८ किलो गहू देण्यात येईल. अन्नपूर्णा कार्डधारकांना १० किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. कल्याणकारी संस्थांना कोट्याप्रमाणे ६.१५ रूपये दराने आणि गहू ४.८० रूपये दराने देण्यात येईल.

      स्वस्त धान्य दुकानदारांनी ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत आपला धान्य कोटा उचलून कार्डधारकांना वितरीत करावा. धान्य कोटा उचलण्यास मुदत वाढ देण्यात येणार नाही.

      कार्डधारकांची रेशनवरील धान्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास संबंधित मामलेदार कार्यालयांत किंवा नागरीपूरवठा खाते जुन्ता हाऊस पणजी येथे ती सादर करावी.