सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत राणे यांचे निधन !

0
1023

 

गोवाखबर: सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत सीताराम राणे (वय 69 वर्षे) यांचे 5 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
शशिकांत राणे हे वर्ष 1995 पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. त्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये धर्मप्रसार करण्याचे दायित्व काही काळ सांभाळले. इंडियन बँकेतून शाखा व्यवस्थापक या पदावरून पूर्णवेळ सेवा करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वर्ष 1999 मध्ये दैनिक सनातन प्रभातची गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती चालू झाल्यावर उपसंपादक म्हणून ते सेवा करू लागले. वर्ष 2012 मध्ये त्यांनी सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक म्हणून दायित्व सांभाळले.