सध्याची टर्म पूर्ण करणार-राणे

0
980

 

 पर्येच्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आमदार म्हणून निवडून दिले आहे.जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमदार म्हणून सध्याची टर्म पूर्ण करणार असल्याचे पर्येचे आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी स्पष्ट केले आहे.
वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अलीकडेच आपले वडील यापुढे सक्रिय राजकारणामधून निवृत होणार असून वाळपई आणि पर्ये मतदारसंघावर यापुढे आपला ताबा असेल असे स्पष्ट केले होते.वाळपईच्या पोटनिवडणुकी नंतर सीनियर राणे आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा सुरु होती या पार्श्वभूमीवर राणे यांना आज प्रश्न केला असता त्यांनी वरील खुलासा केला.
राणे म्हणाले,तस बघितल तर गेल्यावेळच्या निवडणुकी पूर्वी सुद्धा पण मी निवृत्त व्हायचा विचार केला होता.मात्र तसे होउ शकले नाही.आताच्या घड़ीला सध्याची टर्म शेवटची असेल असे वाटते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सध्याची टर्म आपण पूर्ण करणार आहे.
वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणे आणि रॉय नाईक यांच्यात जोरदार टक्कर होईल का असा पत्रकारांनी विचारला असता राणे यांनी आपण निवडणूक लढवत नाही.जे निवडणूक लढवत आहेत त्यांना विचारा असे सांगून त्यांनी उत्तर द्यायचे टाळले.
वाळपई मतदारसंघातून मुलगा निवडणूक लढवत असल्याने काँग्रेसने त्यांना कौटुंबिक कारणामुळे त्यांना प्रचारा पासून अलिप्त राहण्याची सवलत दिली आहे.पणजी मतदारसंघात काँग्रेसचे इतर आमदार मनोहर प्ररिकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या गिरीश चोडणकर यांचा प्रचार करत असले तरी प्रतापसिंह राणे मात्र अद्याप पणजीत प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.आपल्या वडीलांसाठी कुटुंब प्रथम मग पक्ष लागतो.ते आपल्या सोबत असून त्यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवत असल्याचे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले असल्याने त्याला जोडून राणेंच्या अलिप्त राहण्याकडे बघितले जात आहे.