सत्तेचा माज आलेल्यांना पराभूत करा:वेलिंगकर

0
949

पणजी आणि वाळपईची पोटनिवडणूक निर्णायक ठरणार आहे.सत्तेचा माज आलेल्याना घरी पाठवायची चांगली संधी चालून आली आहे.सध्याचे अभद्र सरकार जनतेसाठी घातक असून गोव्याच्या भवितव्यासाठी गोवा सुरक्षा मंचच्या आनंद शिरोडकर यांना विजयी करा असे आवाहन आरएसएसचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी केले.
गोवा सुरक्षा मंचने पणजीचे उमेदवार शिरोडकर यांच्या प्रचारासाठी पणजी चर्च ते आझाद मैदान पर्यंत प्रचार फेरी काढली होती.फेरीची सांगता आझाद मैदानावर झाली.त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वेलिंगकर यांनी पणजीतून मनोहर पर्रिकर यांना पराभूत करण्याचे आवाहन केले. पर्रिकर मुख्यमंत्री पदावर राहून निवडणूक लढवत असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला. शिरोडकर यांनी पणजीची सेवा करण्यासाठी आमदार म्हणून निवडून द्या असे आवाहन करताना आपली लढत पर्रिकर यांच्याशी नाही तर काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांच्याशी असल्याचे सांगितले.