सचिवालयात संविधान दिन साजरा

0
130

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संविधान दिनानिमित्त सचिवालय व मंत्रालयीन विभागातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत संविधानाच्या ‘प्रस्तावने’चे वाचन केले. पर्वरी येथील सचिवालयातील खुल्या जागेत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना डॉ. सावंत यांनी संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यादिवशी भारतीय संविधानाचे रचनाकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही देश आदरांजली वाहतो व त्यांना आपण नेहमीच आदर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि नोकरशहा वर्गाने देश सुरळीतपणे चालविण्यासाठी संविधानाचे पालन करावे, असे सांगितले.

यावेळी मुख्य सचिव परिमल राय, आयएएस व इतर सचिव उपस्थित होते.