सक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर

0
134

गोवा खबर : भाजपात सक्षम नेत्यांची कमतरता असल्यामुळे राज्य कसे चालवायचे असते ह्याचे ज्ञान त्यांना नाही आणि यासाठी राज्य उधवस्त झाल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

“कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर गोव्याला सर्व समस्यांतून मुक्त करुन, योग्य दिशेने नेले जाईल.” असे आश्वासन त्यांनी गोव्यातील जनतेला दिले आहे.
“आणखी आठ महिने धैर्य ठेवा. आम्ही सत्तेत येऊन गोव्यातील लोकांना न्याय देऊ. ” असे ते  म्हणाले.
चोडणकर यांनी शनिवारी कॉंग्रेस हाऊस पणजी येथे पत्रकार परिषद घेवून भाजपच्या चुकीच्या कृत्याबद्दल  जोरदार टिका केली. या वेळी साखळीचे माजी  नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी, नगरसेवक राजेश सावळ, माजी सरपंच प्रवीण ब्लागन आणि माजी नगराध्यक्ष रियाज खान उपस्थित होते.
 “चांगले नेते घडविण्यात भाजप अपयशी ठरला आहे. एका रात्रीत आमदारांना कसे विकत घेता येते आणि सत्ता कशी काबीज करता येते याचे तंत्र त्यांना माहित आहे. परंतु आरएसएसच्या  तथाकथित आत्मानिरभर युनिटमध्ये सक्षम व  योग्य नेते तयार करण्याची क्षमता नाही. ” असे चोडणकर म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील लोकांनी दिलेल्या कौलाचा भाजपाने आदर केला नाही आणि चुकीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. “राज्यात भाजपची परिस्थिती आता अशी झाली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठीही, कॉंग्रेसने पाठिंबा दर्शविलेल्या उमेदवारांना ते ‘भूखंड’ देण्याची आमिषे दाखवित आहेत.” असे ते म्हणाले.
पालिकांच्या आरक्षण विषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांकडे भ्रष्ट भाजप सरकारने दुर्लक्ष कसे ते सांगताना, चोडणकर यांनी म्हटले की न्यायालयाने नगरविकास मंत्र्यांवर जे भाष्य केले होते ते बघितल्यास त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
सत्ता मिळवण्यासाठी भाजपने संविधानाची जी चेष्टा केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेले भाष्यही त्यांनी नमूद केले.
सत्तेची आशा असलेल्या भाजपने विरोधी उमेदवारांना आमिषे दाखवली. पण ती न स्विकारलेल्या सर्व नगरसेवकाचे त्यांनी  अभिनंदन केले.
साखळीतील या नगरसेवकांनी भाजपकडून आलेल्या बंगलो, फ्लॅट्स आदींचा समावेश असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ऑफर नाकारल्या, जर “आमदारांनी” असाच संयम दर्शविला असता तर हे भ्रष्ट आणि लोकशाहीविरोधी भाजप सरकार आज नसते असे ते म्हणाले.
पालिकेचे मुख्य अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करीत आहेत आणि त्यांना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगरसेवक धर्मेश सगलानी म्हणाले.
सागलानी म्हणाले की,  भाजपा लोकांमध्ये अशी भीती निर्माण करीत आहे की त्यांना जर  पाठिंबा दिला नाही तर  लोकांना त्रास सहन करावा लागेल. लोकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप आपल्या शक्तीचा गैरवापर करीत आहे.
मालमत्ता खरेदीबाबत चुकीच्या मुद्द्यांवरून भाजपने त्यांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे साखळीचे नगरसेवक राजेश सावळ म्हणाले.
“भाजप सत्तेत येण्यासाठी राज्याचे नुकसान कसे करत आहे हे लोकांना माहित असले पाहिजे.” असे ते म्हणाले.
“भाजप नेते लोकांना धमकी देत ​​आहेत की, जर ते सत्तेत आले नाहीत तर लाडली लक्ष्मी आणि गृह आधार लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.” असे  सावळ म्हणाले.
प्रवीण ब्लागन म्हणाले की, राजकीय शक्ती लोकांच्या हितासाठी वापरली पाहिजे, त्यांचा छळ करण्यासाठी नाही.
नगराध्यक्ष यशवंत मडकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावाची प्रकीया पुढे नेण्यास भाजपने अडथळे निर्माण केल्याने या नगरसेवकांनी आपल्या  प्रतिक्रिया दिल्या.
याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर हा ठराव सगलानी गटाने ७-० मतांनी जिंकला.
आता नगराध्यक्ष निवडण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिक अडथळे निर्माण करु नयेत आणि कायद्यानुसार प्रक्रिया पुढे न्यावी असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.
नगराध्यक्षच्या केबिनला कुलूप ठोकण्याच्या आणि उपनगराध्यक्षांना पदभार नाकारण्याच्या भाजप सरकारच्या कृत्याचा त्यांनी निषेध केला.
एका  प्रश्नाला उत्तर देताना सावळ  आणि ब्लागन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या वतीने भाजपच्या स्थानिक अदानी आणि अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांची ऑफर त्यांना दिली होती.