संरक्षण सामग्रीच्या आधुनिकीकरणासाठी सरकार कटीबद्ध-श्रीपाद नाईक

0
815

गोवा खबर:देशवासियांच्या आकांक्षापूर्तीसाठी सरकार संरक्षण उत्पादनांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

ते  आयआयटी नवी दिल्ली येथे आयोजित ‘मेक इन इंडिया 2.0’ या संरक्षण आणि सुरक्षा प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत संरक्षण उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच आता भारतीय दलांनी भारतातच निर्मित आयुध प्रणाली वापरण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचे संरक्षण उत्पादन निर्मितीत महत्वाचे स्थान आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, नवोत्पादकता, तरलता, अनुकूल आणि लवचिकता निर्माण होते. भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राचे भवितव्य ठरवण्याची ताकद सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.