संरक्षण विभागाचे धोरणात्मक भागीदारी धोरण

0
949

गोवा खबर:संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीवरील धोरण 31 मे 2017 रोजी संरक्षण खरेदी प्रक्रियेच्या अध्याय-7 मध्ये समाविष्ट करण्यात आला असून संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तो अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर तो त्वरित लागू करण्यात आला.

धोरणात्मक भागीदारीमध्ये लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या आणि सशस्त्र वाहने यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चार विविध विभागांसाठी माहितीपट विनंती (आरएफआय) जारी करण्यात आली असून याचे मूल्यमापन प्रक्रिया चालू झाली आहे त्यामुळे एमपी मॉडेल कृतीशिल होण्यास वेळ लागणार नाही.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.