संरक्षण राज्‍यमंत्र्यांची पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट

0
450

 

 

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांनी 5 नोव्हेंबर 2019 रोजी पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट दिली. 11 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाअंतर्गत येत असून, या विभागातील कार्य तयारीचा त्यांनी आढावा घेतला. या विभागाकडे 1 हजार 240 कि.मी. लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमा 7 हजार 516 कि.मी. लांबीच्या सागर किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी नाईक यांचे स्वागत केले.

देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी दक्षिण विभागाचे समर्पण आणि व्यावसायिक दृष्टीकोनाचे संरक्षण यांची राज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. विविध दुर्घटना आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी दक्षिण विभाग नागरी प्रशासनासाठी असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि सहाय्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांनी अभिनंदनही केले.