संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रम

0
940

गोवा खबर:केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या 4 ऑक्टोबर रोजी होणार्‍या वाढदिनानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठान , गोवातर्फे सापेंद्र, जूने गोवा येथील निवासस्थानी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 4 रोजी सकाळी 9.30 वाजता प्रसाद नेत्रालय रुग्णालय, उडपी आणि नेत्रज्योती चॅरीटेबल ट्रस्ट, उडपी यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी आणि शस्त्रक्रीया व चष्मे वाटप शिबीराचे प्रमुख अतिथी उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर हेही या कार्यक्रमास हजर राहणार आहेत.

याशिवाय, गोवा शिपयार्ड लि. तर्फे कार्डिओलॉजी व दंत तपासणी केली जाणार आहे. आयुेर्वद महाविद्यालय, शिरोडा व श्री कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय- शिरोडा, सांडू फार्मासिक्युटीकल्स, एमिल फार्मा, कुडोस लॅब आदीकडून मोफत आयुर्वेद व होमिओपॅथी सल्ला तसेच औषध वितरण केले जाणार आहे. या शिबीरात मधूमेह, कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणी तसेच आयएमई-9 गोळ्यांसह औषधांचे वितरणही केले जाणार आहे.

कोटा, येथील आयुर्वेदीक न्यरो हॉस्पिटल व आयुष्यमान आरोग्य व समाज कल्याण फाँडेशन, पर्वरी तर्फे योग प्रात्यशिके , न्यरोथेरपी औषधोपचार, निसर्गोपचार, अ‍ॅक्युपंक्चर व पर्यायी औषधोपचारासाठी सल्लाही दिला जाणार आहे. भाजपच्या युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. निवडलेल्या गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप तसेच शस्त्रक्रीयेसाठी त्याच दिवशी नेले जाणार आहे. या रुग्णांने आपली ओळखपत्रे , विमाची कागदपत्रे सोबत घेणे आवश्यक आहे.

4 रोजी सकाळी 9.30 ते रात्री 9.30 पर्यंत औषध वनस्पती वाटप, सकाळी 11 वा. वृद्धाश्रमात फळे वाटप, संध्याकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत प्रसिद्ध गायक  अक्षय नाईक व साथी कलाकारांचा सांगितीक कार्यक्रम साजरा होणार असल्याचे आयोजकांतर्फे कळवण्यात येत आहे.