संरक्षण क्षेत्रातील  आयडेक्स (i DEX) अत्याधुनिक उपलब्धीची माहिती देणारी संरक्षण संशोधन परिषद  उद्या होणार

0
908

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्य अतिथी

गोवा खबर:संरक्षण क्षेत्रातील संशोधन विभाग  आयडेक्सच्या उपलब्धीची माहिती सांगण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उद्या नवी दिल्लीत ‘डिफ-कनेक्ट’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. संरक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधने जगासमोर आणून संरक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या उद्योजकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचा उपयोग होऊ शकेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील. 

आयडेक्स म्हणजे ‘संरक्षण उत्कृष्टतेसाठीची संशोधने’ या अंतर्गत येणारे सर्व उपक्रम आणि हितसंबंधी गट म्हणजे संरक्षण मंत्रालय, आयडेक्स मधील स्टार्ट अप कंपन्या, संरक्षण संशोधन संस्था, लष्कराचे तीन विभाग, डीआरडीओ, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्या, आयुध निर्माण कंपन्या, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग आणि असे सगळे घटक संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि संशोधनाची माहिती याद्वारे कंपन्यांना दिली जाईल.

यावेळी आयडेक्स पोर्टलचे उद्घाटन, डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंज (डिस्क)-3 चे उद्घाटन देखील यावेळी होणार आहे. त्याशिवाय संरक्षण संशोधन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

तसेच संरक्षण विभाग आणि खाजगी उद्योगांदरम्यान संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 350 होऊन अधिक स्टार्ट अप कंपन्या आणि विविध संरक्षण तंत्रज्ञान संस्थामध्ये संशोधक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या परिषदेमुळे संरक्षण क्षेत्रातील सर्व हितसंबंधी गट आणि कंपन्या यांच्यातली दरी दूर होणार आहे,  याचा लाभ येत्या 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान लखनऊ, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या संरक्षण प्रदर्शनात होऊ शकेल.