संजय कुमार यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती

0
130

गोवा खबर:उत्तर गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून महसूल सचिव संजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे १ जानेवारी २०२१ ही पात्र तारीख ठरवून गोवा राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसंबंधी मतदार यादीची विशेष उजळणी मोहिम चालू केली आहे. मतदार यादी निरीक्षक २० नोव्हेंबर रोजी सकाळी  १० वाजता २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील.

.