संघाचे स्वयंसेवक साथ देत असल्याने शिरोडकर यांचा विजय निश्चित:राऊत

0
994

पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री पद बाळगुन निवडणूक लढवत आहेत.हा राजकीय भ्रष्टाचार असून न्यायाचा तराजू असमतोल बनला असल्याची टिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
राऊत यांनी पर्रिकर यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. राऊत म्हणाले,विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप विरोधात कौल दिला होता मात्र पर्रिकर यांनी राजकीय तडजोडी करून आघडी सरकार बनवले आहे.भाजप ज्याना राजकीय शत्रु समजत होता त्याच कौरवांना घेऊन पर्रिकर यांनी सरकार बनवले असून जनतेला हा प्रकार पचलेला नाही.त्यामुळे पणजीच्या पोटनिवडणुकीत जनता पर्रिकर यांचा पराभव करून गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना उमेदवार आनंद शिरोडकर निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
गोव्यात राजकीय क्षेत्रात जो उन्माद आणि उत्पात होता त्याविरोधात सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली आरएसएसचे स्वयंसेवक ठामपणे राहतील यात शंका नाही. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार शिरोडकर यांच्या पाठीशी संघाचे स्वयंसेवक आणि जनता यावेळी राहिल बदल घडवून आणेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
राऊत यांनी ईव्हीएम मशीनवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.ईव्हीएम हे त्यांचे शेवटचे हत्यार आहे.ईव्हीएम हे विश्वास ठेवण्या लायक नसुन निवडणुकीतून ईव्हीएमच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने बऱ्याच दिवसांची असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
मगो पक्ष हा ढवळीकर वादी पक्ष असून एक ढवळीकर पडले आता दूसरे ढवळीकर सुद्धा पडतील असा दावा राऊत यांनी केला.