संघाचे बहुतेक स्वयंसेवक भाजप विरोधात:वेलिंगकर

0
1074

गोव्यातील जवळपास 95 टक्के राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात असून पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत संघाचे कार्यकर्ते गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार आनंद शिरोडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी आज पणजी येथे केला. वेलिंगकर यांनी भाजप दबावाचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांच्यावर दबाव आणून त्यांनी गोवा सुरक्षा मंच किंवा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवू नये यासाठी भाजपने नाईक यांच्यावर दबाव टाकला असा आरोप वेलिंगकर यांनी केला.भारतीय भाषा सुरक्षा मंचचा गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार शिरोडकर यांना पूर्ण पाठिंबा असून शिरोडकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.ज्यांनी राजकीय जीवनात केवळ सेटिंग केली त्यांना तत्वाची भाषा शोभत नाही असा टोला हाणत वेलिंगकर यांनी भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर यांच्यावर जोरदार टिका केली.