श्रेहा धारगळकर यांचा शिवसेनेत प्रवेश;शिवोलीत ताकद वाढणार

0
1352
गोवा खबर:शिवोली येथील समाज सेविका  श्रेहा धारगळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्यप्रमुख जितेश कामत यांनी त्यांचे स्वागत केले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गोव्यातील नवीन उदयास आलेल्या प्रादेशिक पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय भाग घेत मोलाची भूमिका बजावली होती. एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला अध्यक्षपदाची आलेली अॉफर धुडकावून धारगळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेची गोव्यात वाढत असलेली लोकप्रियता पाहून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज सेविका असल्या कारणाने त्यांचा जनसंपर्क दांडगा असुन गोवा शिवसेनेची महिला आघाडी स्थापन करण्यास  फायदा होणार असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे. धारगळकर या महिलांना पक्ष कार्यात जोडण्याचा प्रयत्न करणार असून त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत महिला शक्ती आणखी बळकट होणार असल्याचे कामत यांनी  कळवले आहे.