श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशनतर्फे ‘मानवी मूल्ये आणि न्यायजगत’ विषयावर परिषदेचे आयोजन

0
1328

 

 

 

भारताचे सरन्यायाधीश  न्यायमूर्ती  दीपक मिश्रा यांच्याहस्ते चर्चासत्राचे उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाचे  न्यायमूर्ती   दलवीर भंडारी हे या परिषदेत बीजभाषण देतील.

 

गोवा खबर८: येत्या ११ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट रोजी “मानवी मूल्ये आणि कायदेशीर जगत” या विषयावरील परिषदेत न्यायविधिज्ज्ञ,  न्यायाधीश आणि कायदेविषयक ज्येष्ठ अभ्यासक हे प्रशांती निलायम येथे महामंथनासाठी एकत्र येणार आहेत. श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित या परिषदेत मानवी मूल्ये दृढ करण्यात न्याय व्यवस्थेची भूमिका या विषयावर चर्चाविमर्श या मंडळींकडून होणार आहे. देशभरातील बार कौन्सिल, खंडपीठे आणि विधी शिक्षणसंस्था यांना या दोन दिवसांच्या विचारमंथनांत सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या विषयाला विस्ताराने हात घालण्यासाठी आणि मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश,  दीपक मिश्रा स्वत: उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.

एनसीएलएटीचे चेअरमन आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती  जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली परिसंवाद आणि भारताच्या विविध उच्च न्यायालयांतील इतर अनेक विद्यमान न्यायाधीशांकडून संवैधानिक अधिकार आणि मानवी मूल्यांवर या निमित्ताने चर्चा घडून येणार आहे.

मानवी मूल्यांच्या उत्कर्षात न्यायव्यवस्थेच्या भूमिकेविषयी चर्चा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही रमणा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती  अमिताव रॉय यांच्या नेतृत्वात योजण्यात आली आहे..

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. टी बी राधाकृष्णन हे कायदेतज्ज्ञांमधील नैतिकता आणि सत्यनिष्ठा या चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवतील. न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील या चर्चेत भारतातील विविध उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचा समावेश असेल.

या निमित्ताने भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती आणि श्री सत्य साई विद्यापीठाचे माजी कुलपती एम एन आर वेंकटचलय्या यांच्या सत्काराचा कार्यक्रम योजण्यात आला आहे. श्री सत्य साईं बाबा, त्यांच्या संस्था आणि त्यांचे संदेश यांच्याशी संबंधित असलेले बार आणि खंडपीठातील अनेक दिग्गजांमध्ये त्यांचा समावेश आहे.

श्री सत्य बाबा यांनी मानवतेच्या योग्य अभ्यासाला मान दिला आहे. त्याचे सिद्धांत पाच प्रमुख स्तंभांवर आधारलेले आहेत जसे सत्य, धर्म, प्रेम, शांती आणि अहिंसा. त्यांनी मनुष्य ही देवाद्वारे निर्मित सर्वोच्च सृष्टी मानले आहे आणि त्यांच्या मते मानवी मूल्ये हे मानवी जीवनाचे सार आहेत. प्रत्येकास केवळ या अंतर्निर्मित दैवीपणाची जाणीव असणे केवळ आवश्यक नसून मानवी श्रेष्ठत्व निरंतर उमलत जाणे आवश्यक आहे.

भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनामध्ये प्रत्येक भारतीयाला, त्याची जात, रंग, पंथ, संप्रदाय आणि धर्म काहीही असो श्रेष्ठता मानवी जीवन प्राप्त करण्याची हमी दिली गेली आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे हे आपल्या लोकांसाठी एक वरदान आहे आणि आपली न्यायव्यवस्था मानवी मूल्यांची रक्षक आहे आणि भारतातील नागरिकांच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या अधिकारांचा विस्तार करण्यास आणि ते कायम राखण्यातही तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बदलता काळ आणि बदलत्या सामाजिक आचार-विचारानुरूप मानवी मूल्यांची पूर्तता करण्यात न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर पुन्हा जोर देणे आवश्यक बनले आहे आणि भारताच्या संविधानातील तत्त्वे आणि मूल्यांना बळकट करण्याची तिची मूळ जबाबदारी आहे.

ही परिषद म्हणजे आजच्या आधुनिक जगात मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचा पाठपुरावा करण्याचा एक प्रयत्न आहे.

परिषदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

११ ऑगस्ट (शनिवार) १२ ऑगस्ट (रविवार)
१३.४० वा.: उद्घाटन समारंभ

स्थळ: पूर्णचंद्र हॉल

०७.५० वा.:  सत्र तिसरे

धर्म आणि कायद्याचे राज्य

१५.२० वा.:  सत्र पहिले

संवैधानिक अधिकार आणि मानवी मूल्ये

१०.३० वा.: सत्र चौथे

न्यायदान व्यवसायात नैतिकता व सत्यनिष्ठा

१७.३० वा.:  सत्र दुसरे

सत्कार सोहळा आणि भाषणे

१२ वा.: सत्र पाचवे

समारोप भाषण

 

श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशविषयी :

Sri Sathya Sai Seva Organisations, India and the Sathya Sai International Organisations run on the divine guidelines of Bhagawan Sri Sathya Sai Baba, Prasanthi Nilayam, Puttaparthi,  Andhra Pradesh. Sri Sathya Sai Seva Organisations, India is involved in the service of the society in 20 states of India with more than 8 Lakh volunteers working selflessly for individual as well as societal development. The Sathya Sai International Organsations (SSIO) is involved in over 120 countries across the five continents. The core focus of the Sathya Sai Seva Organisations is Educare, Healthcare, SocioCare, Aquacare & EcoCare, viz, free drinking water supply to millions in the country; free medicare facilities with the state of the art technology which can match or surpass the best in the world and value based education from KG to PG at Prasanthi Nilayam .All the activities of the Sathya Sai Organisations are absolutely free of cost. The binding force of all the activities is pure Love which is based on the dictum and powerful mantra of Bhagawan Sri Sathya Sai Baba