श्री पेजावर मठाचे श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्या निधनाविषयी पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

0
482

गोवा खबर:उडपी येथील श्री पेजावर मठाचे श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

उडपी इथल्या पेजावर मठाचे श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी कायम लाखो शिष्यांच्या मनात आणि हृदयात राहतील, या सर्वांसाठी ते मार्गदर्शक होते. सेवाभाव आणि अध्यात्मिकतेचे चालते-बोलते ऊर्जा स्थान असलेल्या स्वामीजींनी आयुष्यभर न्यायपूर्ण आणि करुणामय समाज घडवण्यासाठी काम केले. ओम शांती.

मला श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्याकडून बरच काही शिकण्याची संधी मिळाली, हे माझे सद्‌भाग्य आहे. अलिकडेच गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आमची झालेली भेट चिरस्मरणीय ठरली. त्यांच्या असामान्य ज्ञानाचा कायमच सर्वांना लाभ मिळाला. त्यांच्या कोट्यवधी शिष्यांच्या दु:खात मी सहभागी आहे’, असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.