श्रीपाद भाऊंच्या वाढदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरांचा ५ हजार लोकांना लाभ

0
895

 

गोवा खबर:केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनानिमित्त  ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्डिओलॉजी व दंत तपासणी, आयुर्वेद व होमिओपॅथी सल्ला, न्यरोथेरपी औषधोपचार, निसर्गोपचार, अ‍ॅक्युपंक्चर,योग आदी विविध वैद्यकीय शिबीरांना सुमारे 5 हजार लोकांनी हजेरी लावली. डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबीरालाही उर्त्स्फुत प्रतिसाद लाभला असून उडपी येथे मोफत डोळ्यांची शस्त्रक्रीया  करण्यासाठी सुमारे 36 जणांना निवडण्यात आले असल्याचे आयोजकांतर्फे कळवण्यात आले.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर,  जलस्त्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, आमदार अतानसिओ मोन्सेरात,भाजपा प्रदेशाध्यक्ष  विनय तेंडूलकर, आमदार  कार्लुस आल्मेदा, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, प्रवीण झाट्ये, जयेश साळगावकर, ग्लेन टीकलो, आलिना साल्ढाना, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत बाबू कवळेकर, दयानंद नार्वेकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, पद्मश्री डॉ. एस.पी. वर्मा,  गोवा आयुष मंत्रालयाचे संचालक डॉ. दत्ता भट, गोवा शिपयार्डचे अधिकारी श्रीकृष्ण कामत व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आयुष मंत्री नाईक यांच्या वाढदिनानिमित्त ‘मातृभूमी सेवा प्रतिष्ठान’- गोवा तर्फे सापेंद्र -जूने गोवा येथील निवासस्थानी भव्य शमियानात  शुक्रवारी  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उडपी येथील प्रसाद नेत्रालय रुग्णालय  आणि नेत्रज्योती चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी आणि  चष्मे वाटप  तसेच अन्य वैद्यकीय शिबीरांचे प्रमुख अतिथी उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा अन्य कार्यक्रमांमुळे व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी नाईक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच  देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी, रक्षा मंत्री राजनाथ सिंग व इतर भाजप मंत्र्त्यांनी  online / फोन द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

नाईक यांच्याहस्ते औषधी वनस्पती वाटप,  वृद्धाश्रमात फळे वाटपही करण्यात आले.  बांबोळी चे श्री पुंडलिक गुरव यांना MPLAD स्कीम तर्फे  ३-व्हिलर दुचाकी देण्यात आली. याशिवाय, गोवा शिपयार्ड लि. तर्फे कार्डिओलॉजी व दंत तपासणी केली गेली.  गोवा सरकार, आयुर्वेद महाविद्यालय – शिरोडा, श्री. कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय – शिरोडा, सांडू फार्मास्युटिकल्स,एमिल फार्मा, कुडोस लॅब इ. तर्फे मोफत आयुर्वेद आणि होमिओपथी सल्ला आणि औषधे वितरण झाले. समाज कल्याण फाँडेशन, पर्वरी तर्फे योग प्रात्यशिके , न्यरोथेरपी औषधोपचार, निसर्गोपचार, अ‍ॅक्युपंक्चर व पर्यायी औषधोपचारासाठी सल्लाही देण्यात आला. भाजपच्या युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध गायक  अक्षय नाईक व साथी कलाकारांचा संगीत व गीतांचा कार्यक्रम झाला.