श्रीपाद नाईक १६ रोजी पेडणे मतदारसंघात

0
780

 

 

गोवा खबर:उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांचा मतदारसंघात प्रचार सुरू झाला असून गुरुवारी प्रियोळ मतदारसंघात लोकांच्या भेटी घेतल्यानंतर  १६ रोजी पेडणे मतदारसंघात मुख्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतील.

कोरगांव येथून सकाळी ९.३० वा. श्रीपाद नाईकांचा प्रचार सुरू होणार असून पेडणे येथे ते १०.४५ वा. असतील. ११.३० ते १२.०० पोरस्कडे खाजने येथे तर १२.१५ ते १२.४५ उगवे, तांबोशे, मोपा याठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. १.१५ ते २.०० पर्यंत त्यांचा दौरा तोरसे येथे असेल.

दुपारच्या सत्रात ३.३० वा. चांदेल आणि हसापुर येथे तर ४.३० ते ५.०० पर्यंत इब्रामपूर येथील कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतील. हळर्ण आणि तळर्ण येथे ५.३० ते ६.०० पर्यंत तर कासारवर्णे येथे ६.३० ते ७.०० या वेळेत असतील. ७.३० ते ८.०० पर्यंत वझरी, ८.१५ ते ८.४५ नागझर आणि शेवटी ९.०० ते ९.३० पर्यंत धारगळ येथील कार्यकर्ते आणि मुख्य मतदारांशी संपर्क करतील.