श्रीपाद नाईक यांनी घेतली कॅन्सरपीडीत मुलांची भेट

0
742

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पर्यटन भवन येथे कॅन्सर पीडीत मुलांची भेट घेतली. ही मुलं मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेली आठ वर्षे नियमितपणे टाटा कॅन्सर रुग्णालयातून मुलं गोवा फिरायला येतात.

कोकण रेल्वे त्यांच्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करते. तसेच गोवा पर्यटन विभागाकडून त्यांना बोटीवर आणि विविध ठिकाणांच्या भेटीची व्यवस्था केली जाते. व्याधीग्रस्त मुलांना यानिमित्ताने आनंद मिळतो, हेच समाधान असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. गोवा पर्यटन खात्याचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.