श्रीपाद नाईक यांना सत्तरी मधून 25 हजार मतांची आघाडी मिळेल: राणे

0
747
गोवा खबर:उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना सत्तरी तालुक्यातून 25 हजार मतांची आघाडी मिळेल,असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीपाद नाईक यांनी आज वाळपई मतदारसंघात प्रचार दौरा केला.यावेळी आरोग्यमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
वाळपई मतदारसंघात पार पडलेल्या सगळ्या कोपरा बैठकांना पाचशेच्या आसपास लोक उपस्थित होते.मतदारांची पसंती नाईक यांना असल्याने नाईक मोठ्या माताधिक्क्याने विजयी होतील,असा दावा राणे यांनी केला आहे.
राणे म्हणाले,सत्तरी तालुक्यातून नाईक यांना 25 हजार मतांची आघाडी मिळणार आहे.तालुका भाजपमय झाला असून नाईक यांना आज मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता.
उत्तर गोव्यात नाईक यांना निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगून राणे म्हणाले,उत्तर गोव्या बरोबरच दक्षिण गोवा आणि तिन्ही पोटनिवडणुकीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना विजयी करणार आहे.
नाईक यांनी विश्वजीत राणे भाजपमध्ये आल्या नंतर सत्तरी तालुक्यात पक्षाची ताकद वाढली असून यावेळी मताधिक्य वाढेल असा विश्वास व्यक्त केला.सत्तरी तालुक्यात यापुढेही खासदार निधी मधून विकास प्रकल्प राबवून सत्तरीच्या विकासात योगदान देत राहीन,असे आश्वासन नाईक यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.