श्रीपाद नाईक यांच्या हस्ते केरी-फोंडा येथे विकासप्रकल्पांचे उदघाटन

0
917

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज केरी,फोंडा येथे विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले. खासदारनिधीतून उभारलेली व्यायामशाळा, 10 लाख रुपये किंमतीची व्यायामाची उपकरणे, 8 लाख रुपये खर्चून उभारलेला हायमास्ट विजेचा दिवा, सरकारी होमिओपथी रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर  नाईक यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेतली.

जनतेच्या कल्याणासाठी खासदारनिधीच्या माध्यमातून कामे पार पडत असल्याचे  नाईक याप्रसंगी म्हणाले. तसेच जनता आणि जनप्रतिनिधी यामध्ये दुवा साधण्याचे काम शासकीय अधिकारी करतात. त्यामुळे त्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

याच कार्यक्रमात राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून आरोग्य भारतीच्या माध्यमातून 25 शाळांना औषधी वाटीकांसाठी 6 लाख 25 हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच गावकऱ्यांना मोफत औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.