श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ई-औषधी प्रणालीचे उदघाटन

0
1164

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ई-औषधी प्रणालीचे उदघाटन करण्यात आले.

ई-औषधी ही आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपथीसाठीच्या औषधविक्री परवान्यांसाठीची ऑनलाईन प्रणाली आहे. याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, ई-औषधी प्रणालीमुळे पारदर्शकता, माहिती व्यवस्थापन आणि जबाबदारी या सर्व बाबी साधल्या जातील. या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदाराला निर्धारीत वेळेत एसएमएस आणि ई-मेल च्या माध्यमातून अर्जाची स्थिती कळवण्यात येईल.

आयुष मंत्रालयाचा हा उपक्रम सरकारच्या ई- गव्हर्नन्स, व्यवसायसुलभता आणि मेक इन इंडिया या धोरणाशी पूरक आहे. या प्रसंगी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांचीही उपस्थिती होती.