श्रीपाद नाईक यांच्या मयेतील प्रचारफेरीला प्रतिसाद 

0
1453
गोवा खबर:मये मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी आज तिसऱ्या फेरीतील प्रचार पूर्ण केला. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
 भाजपचा बालेकिल्ला मानला गेलेल्या मये मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी दोन वेळा प्रचार दौरा केला होता. मात्र काही भाग राहिला होता. त्या भागात  नाईक यांनी आज लोकांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.
सकाळी ९.३० वाजता वरपाल येथून प्रचाराची सुरवात झाली. हातुर्ली चवाठा, तिखाजन, वायंगणे, भावकई, सावनवाडा, भटवाडी तळेश्वर मंंदिर, शारदानगर  कॉलनी केळबाईवाडा, केळबाई मंदिर परिसर, श्री सातेरी मंदिर परिसर – वन मावळिंगे या ठिकाणी प्रचार करण्यात आला.  नाईक यांच्या सोबत माजी आमदार व सभापती अनंत शेट, विद्यमान आमदार प्रवीण झांटये व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 सायंकाळी ४ वाजता झांटये महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून मये मतदारसंघातील प्रचाराची सांगता झाली.